सामाजिक

लोणी (धामणी ) येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त शर्यतीमध्ये धावले ३५० बैलगाडे !!

img 20260220 wa0740
img 20260220 wa0740

पंचनामा (प्रा.अरुण गोरडे)- लोणी (ता.आंबेगाव) येथील महाशिवरात्री यात्रेनिमित्त दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये ३५० बैलगाडा मालक सहभागी झाले होते.एकूण इनाम दोन लाख ७५ हजार १११ होता. इतर अनेक आकर्षक बक्षिसे होती.

प्रथम क्रमांक फळीफोडीचा मान बबलू संजय पोखरकर- वडगावपीर व कचरू रामभाऊ पानमंद- चांडोह यांच्या बैलगाड्यांनी मिळवला. 
द्वितीय क्रमांक मित्रप्रेम बैलगाड संघटना- शिरदाळे व बाळासाहेब मनाजी मांदळे- वाफगाव.
तृतीय क्रमांक शुभम शाम शेळके- पाबळ व दिपक सुरेश खैरे- हिवरे.
चतुर्थ क्रमांक तन्वी बिल्डर बाबूशेट आदक- मांदळेवाडी व आप्पा बबन मांदळे- मांदळेवाडी.
गाड्याला फळी फोडीचा मान मिळाला.
तर घाटाचा महाराजा जयमल्हार बैलगाडा संघटना आतूल सिनलकर- तळेगाव व घाटाचा राजा विराज विकास कुटे- वाघोली या गाड्याला मिळाला. 

बैलगाडा शर्यतीनंतर रात्री पांडूरंग मुळे सह तूकाराम खेडकर मांजरवाडीकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम झाला.

शरद बॅकेचे संचालक अशोक आदक पाटील.,तंटा मुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, चंद्रकांत गायकवाड, पोलिस पाटील संदिप आढाव, सतिश थोरात, बबन वाळूंज, बाळासाहेब गायकवाड, दिलीप आदक, गणेश गायकवाड, नामदेव वाळूंज यांनी व ग्रामस्थांनी बैलगाडा घाटाची व्यवस्था पाहिली.

यात्रा उत्सवाच्या काळात पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्ताचे काम चोख पार पाडले.

img 20260220 wa0737

लोणी (ता.आंबेगाव ) येथे बैलगाडा शर्यती पार पडल्या.

fb img 1771121541695

Related posts

समर्थ शैक्षणिक संकुलात निर्भय कन्या अभियानाचे आयोजन !!

Chief Editor

भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या संपन्न !!!

Chief Editor

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत !!

Chief Editor

Leave a Comment