सामाजिक

बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच !!

images

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून लोणी ( ता.आंबेगाव ) येथील लोणी पाबळ रस्त्यावर बांधन-आदक वस्ती येथे शुक्रवार (दि.१२) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणीच्या दिशेने येत असलेल्या बेबीताई ज्ञानेश्वर आदक (वय- ५४ वर्षे ) यांना अज्ञान वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने त्या जबर जखमी झाल्या आहेत.त्यांना तात्काळ मंचर येथील दवाखान्यात हलवण्यात आले. वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की त्यांचा डावा पाय फॅक्चर झाला असून त्याच्यांवर मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असून त्यांची तब्येत ठिक असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

fb img 1771121541695

या अगोदर सुद्धा बांधन-आदक वस्ती रस्त्यावर अनेक वेळा अपघात झाले असून दोन तीन जनांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.हा राज्य मार्ग दोन तालुक्यांना जोडणारा असून या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहनाची येजा असते.येथील अपघात ग्रस्त जागा लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधन-आदक वरती येथे गतिरोधक बसवावा अशी मागणी शरद बॅकेचे संचालक अशोक आदक पाटील व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आदक यांनी केली आहे.

आठच दिवसापूर्वी याच मार्गावर लोणी येथे यूनियन बॅके समोरील वळणावर ऊसाची वाढे घेऊन जाणारा टेम्पो पल्टी झाला.पण पल्टी होताना रस्त्यावर उभ्या असणार्या क्रेनवर धडकला म्हणून मोठा अपघात होता होता टळला. याही वळणावर गतिरोधक बसविण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कोचर व सदस्या मंगल कैलास गायकवाड यांनी संबंधीत विभागाकडे केली आहे.

Related posts

धामणीत खंडोबाला नागीणीच्या पानाचे लेपवन,फळ फुलांची आरास !!

Chief Editor

नशामुक्त युवा, विकसित भारत’ संकल्प अभियान समर्थ शैक्षणिक संकुलात उत्साहात संपन्न !!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment