सामाजिक

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – पारगाव शिंगवे) येथील घोडनदी परिसरातील विजेचे खांब झाले दुरुस्त !!

1009783309
1009783309

पारगाव येथील घोडनदी लगतचे धोकादायक विजेचे खांब महावितरण कंपनीच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात आले आहेत.तीन दिवसांपूर्वी याबाबत पंचनामा ने बातमी प्रदर्शित केली होती. या बातमीची दखल घेत संबंधित विभागाने ही दुरुस्ती केली आहे. याबाबत पारगाव ग्रामस्थ यांनी पंचनामाचे आभार मानले आहेत.

पारगाव घोडनदी लगत असलेल्या तीन ते चार विजेचे खांब धोकादायक अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.या संदर्भात पंचनामा न्यूज मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महावितरण कंपनीने तात्काळ दखल घेत बुधवारी (दि.१०) संबंधित खांबांची दुरुस्ती केली.घोडनदी कडेला असलेले तीन ते चार विद्युत विजेचे खांब झुकल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

या शेतात अनेक शेतकरी ये-जा असते.त्यामुळे धोकादायक परिस्थितीमुळे परिसरातील नागरीकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या समस्येकडे मा.उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे महावितरण कंपनीचे लाईनमन व्हि.एम.जमदाडे यांच्याकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.त्यानंतर या विषयावर पंचनामा न्यूज मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले.वृत्त प्रसिद्ध होताच तात्काळ महावितरण प्रशासनाने हालचाल करुन गुरुवारी संबंधित विद्युत विजेचे खांब दुरुस्ती करून दिले.तसेच संभाव्य धोका टळला असे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी सांगितले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521

यावेळी पारेश्वर सोसायटीचे मा. उपाध्यक्ष शांताराम ढोबळे,अशोक ढोबळे आदी उपस्थित होते.ग्रामस्थानी महावितरण कंपनीचे आभार मानले.

1009760330
1009760332

Related posts

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे वादळी वारा आणि पावसाने झाले शेतकऱ्यांचे नुकसान !!

Chief Editor

भैरवनाथ सांस्कृतिक महोत्सव खडकवाडी येथे उत्साहात संपन्न !!

Chief Editor

आळंदीत मुक्तादेवी धर्मशाळेत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment