सामाजिक

बटाट्याचे बाजारभाव कोसळले; भांडवलही वसूल होईना !!

img 20261128 wa0570

कांदा सोडता बहुतांश शेतीमालाला दर नाही; शेतकऱ्यांकडून हमीभावाची जोरदार मागणी

लोणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागासह परिसरातील शेतकरी सध्या शेतीमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः बटाट्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदा वगळता बहुतांश शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

बटाटा उत्पादनासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि मशागत यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, बाजारात बटाट्याला मिळणारा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कष्टाने पिकविलेला बटाटा बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर पदरी नफा सोडाच, पण केलेले भांडवलही परत मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दरवर्षी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचे दर वाढत असताना शेतीमालाच्या बाजारभावात मात्र स्थिरता दिसून येत नाही. कधी उत्पादनाला पोषक वातावरण मिळत नाही, तर कधी चांगले उत्पादन होऊनही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडत आहेत. कांद्याला काही प्रमाणात समाधानकारक दर मिळत असला, तरी कांदा वगळता इतर बहुतांश शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र परिसरात आहे.

हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी करा!

शेतीमालाच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. केवळ उत्पादन वाढविण्याचे आवाहन करण्याऐवजी उत्पादित शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळेल, यासाठी सरकारने ठोस धोरण आखण्याची गरज व्यक्त होत आहे.

“खर्च वाढतोय; मात्र शेतीमालाला भाव मिळत नाही. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च भागविणेही कठीण झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन हमीभावाची प्रभावी व्यवस्था करावी.” अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 412560

Related posts

अशी कला, असे कलावंत – तमाशा कलेतील नृत्यबिजली रेखा अण्णा साठे (अकलूजकर)

Chief Editor

तमाशाफड मालक विलास गायकवाड उर्फ राज देवठाणकर यांचे निधन हे सरकारी अनस्थेचा बळी आहे- अरुण खरात ( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक)

Chief Editor

क्रियाशील प्रेस क्लबच्या पनवेल-उरण युनिटच्या सरचिटणीसपदी संतोष वाव्हळ

Chief Editor

Leave a Comment