सामाजिक

लाखनगावच्या गायरानातील आंब्याच्या बागेला आग ; कोट्यवधींचा पाण्यात ; झाडे लावा, झाडे जगवा ; मग आंब्याच्या बागेला आग कुणी लावली? ग्रामस्थांचा संतप्त सवाल ?

1011833024
1011833019

पंचनामा प्रतिनिधी लाखनगाव (ता. आंबेगाव) : लाखनगाव येथील गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या आंब्याच्या बागेला आग लागल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या बागेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, झाडे जगवण्यासाठी लाखो रुपयांची मजुरीही देण्यात आली होती. मात्र, आता लागलेल्या आगीमुळे या खर्चाचा आणि वृक्षसंवर्धनाच्या प्रयत्नांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अनेक मान्यवरांनी वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपण केले होते. त्यामुळे बागेतील झाडांची सद्यस्थिती काय आहे? किती झाडे जिवंत आहेत? किती झाडांचे नुकसान झाले? याची प्रत्यक्ष मोजणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी लाखनगाव ग्रामस्थांनी केली आहे.

एकीकडे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात भीमाशंकर परिसरात महावितरणच्या कामासाठी वृक्षतोड होत असल्याचा मुद्दा समोर येत आहे, तर दुसरीकडे लाखनगावच्या गायरानातील आंब्याच्या बागेला आग लागल्याने पर्यावरणप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.

आग नेमकी कशामुळे लागली? ती कोणी लावली का? बागेच्या देखभालीसाठी झालेला खर्च आणि प्रत्यक्षात जिवंत असलेल्या झाडांची संख्या किती? या सर्व बाबींची संबंधित विभागाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

1011833024

झाडे लावण्याचे फोटो अनेक; पण झाडे जगवण्याची जबाबदारी कुणाची? लाखनगावच्या आंब्याच्या बागेच्या आगीमागचे सत्य समोर येणार का?

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 412563
1011822282

Related posts

समर्थ मध्ये सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ;डिजिटल अरेस्ट म्हणजे सायबर फसवणूक- एच.डी.एफ.सी बँकचे क्लस्टर हेड रोहित तेंडुलकर यांचे प्रतिपादन

Chief Editor

समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आचार्य सुश्रुत जयंती व महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

रक्ताच्या नात्यापलीकडील माणुसकीचा अनोखा बंध ; ७५ वर्षीय बाबूभाई काद्री यांची १५ ते २० वर्षांपासून भाऊबीजेची परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment