
पंचनामा प्रतिनिधी – श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेमध्ये आज भारतीय संविधान दिनानिमित्त प्रशालेचे प्राचार्य श्री सुनील थोरात सर आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी यांच्या हस्ते महामानव भारतरत्न व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले! प्राचार्य श्री सुनील थोरात यांनी संविधान दिनानिमित्त संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा घेताना संविधानाचे महत्त्व विशद केले त्याचप्रमाणे संविधान निर्मितीचा इतिहास सांगितला यावेळी उपस्थित सर्वांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. भारतीय संविधान हे स्वातंत्र्य न्याय समता व बंधुता या तत्वांवर आधारित असून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताचे संविधान हे जगापुढे एक आदर्श संविधान आहे नागरिकांसाठी असलेल्या हक्क व कर्तव्याची जाणीव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी कायद्याचा अभ्यास व कायद्याचे पालन होणे नितांत जरुरी आहे त्याचप्रमाणे संविधानामध्ये असलेल्या आरक्षणाच्या तरतुदीमुळे बहुजन समाज प्रगत झाला असून तळागाळातील समाजाची खूप मोठी प्रगती झाली असून यशस्वी झेप घेतली आहे असे प्राचार्य श्री थोरात यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी संविधानाच्या ग्रंथाचे वाचन व अभ्यास करणे आवश्यक आहे तसेच दैनंदिन वाचन केले पाहिजेअसे त्यांनी आवर्जून सांगितले याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते सहशिक्षक श्री निखिल शिंदे सर यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले आणि उपस्थित यांचे आभार मानले.





