सामाजिक

अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी ; गणना अर्ज भरण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन !!

1011822093

पंचनामा प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांसाठी गणना अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी गणना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार गणना अर्ज तयार करणे व मुद्रित करण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना अर्जांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. तसेच १० डिसेंबरपर्यंत गणना अर्जांवरील कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.

मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकतींचा निपटारा करण्यासाठी १५ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी गणना अर्ज सादर करणे सुलभ व्हावे, यासाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. मतदारांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक गणना अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 412560

Related posts

लोणीत बेकायदेशीर खडी क्रशरविरोधात सोमवारपासून आमरण उपोषण !!

Chief Editor

Chief Editor

भिर्रर्र…. भिर्रर्र….झाली…. उचल की टाक…. सेकंद…. अशा भारदस्त पहाडी आवाजात संपन्न झाली वडगावपीर येथील पिरसाहेब यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत!!

Chief Editor

Leave a Comment