सामाजिक

क्रियाशील प्रेस क्लबच्या पनवेल-उरण युनिटच्या सरचिटणीसपदी संतोष वाव्हळ

1011811506
1011811506

अध्यक्षपदी विशाल सावंत, कार्याध्यक्षपदी दिलीप कडू; सहा वर्षांच्या वाटचालीनिमित्त नवीन कार्यकारिणी जाहीर

पंचनामा प्रतिनिधी – पनवेल : क्रियाशील प्रेस क्लबच्या पनवेल-उरण युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सरचिटणीसपदी ‘सार्थ लोकनीती’चे संपादक संतोष वाव्हळ यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी ‘रायगड संदेश’चे संपादक विशाल रावसाहेब सावंत, तर कार्याध्यक्षपदी ‘लोकशक्ती न्यूज’चे संपादक दिलीप कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. २४ नोव्हेंबर) पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दामोदर कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. संघटनेच्या स्थापनेला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कार्याची दिशा निश्चित करण्यात आली. पत्रकारांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेची व्याप्ती वाढविण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.

संतोष वाव्हळ यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

सरचिटणीसपदी निवड झालेल्या संतोष वाव्हळ यांच्यावर संघटनेच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन, सदस्य नोंदणी, पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा तसेच पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष – विशाल रावसाहेब सावंत, कार्याध्यक्ष – दिलीप कडू, सरचिटणीस – संतोष वाव्हळ, उपाध्यक्ष – भरतकुमार कांबळे, सहचिटणीस – अनिल राय, खजिनदार – चंद्रकांत शिर्के, सहखजिनदार – भूषण साळुंखे, प्रसिद्धीप्रमुख – विठ्ठल ममताबादे.

कार्यकारिणी सदस्य : रामनाथ म्हात्रे, प्रदीप ठाकरे, क्षितिज कडू, असीम शेख, प्रविण पाटील, साबीर शेख आणि सुमेधा लिम्हण.

सल्लागार मंडळ : कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. परेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून, संस्थापक अध्यक्ष विजय कडू, साहिल रेळेकर आणि सय्यद अकबर हे सल्लागार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी विशेष पुढाकार

बैठकीत दरमहा एक ते दोन सामाजिक व संघटनात्मक उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक उत्सव मंडळांचा तसेच स्वच्छता दूतांचा गौरव करणे, पत्रकारांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि संघटनेच्या प्रत्येक सदस्याला अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, असे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.

संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नवीन सदस्यत्व घेण्यास इच्छुक पत्रकारांनी अध्यक्ष विशाल रावसाहेब सावंत (९७०२१५३८५१), कार्याध्यक्ष दिलीप कडू (९२२४५८०६७१) किंवा सरचिटणीस संतोष वाव्हळ (८८५०७२२५२३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

1011808989

Related posts

आंबेगावच्या पूर्व भागात कांदा लागवडीला सुरुवात ; चांगला पाऊस व वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे राबविला गेला अनोखा अन अभिमानास्पद सोहळा !!

Chief Editor

पाबळ (ता.शिरूर) येथील मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये उत्साहात संपन्न झाली छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती !!

Chief Editor

Leave a Comment