Uncategorized

समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न ; विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास !!

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग, बांगारवाडी-बेल्हे येथे प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंगमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रेरणा (इंडक्शन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाची ओळख करून देणे, नर्सिंग व्यवसायाचे महत्त्व पटवून देणे, आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य श्री. भुतकर, नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य  ऐश्वर्या गटकळ, यशवंत फापाळे तसेच प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. डॉ. आवारी यांनी नर्सिंग शिक्षणातील संधी, शैक्षणिक प्रगती आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले.  आरोग्यविषयक संदेशांवर आधारित पोस्टर प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ . कुलदीप रामटेके यांनी शिक्षणाचे महत्त्व, व्यावसायिक कौशल्ये आणि विविध शैक्षणिक शाखांमधील समन्वय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर पनर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.

पल्लवी लेले यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकास, शैक्षणिक प्रगती आणि नर्सिंग क्षेत्रातील सेवाभावी दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने मेमरी क्विझ आणि सॅलड डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, निरीक्षण क्षमता, सर्जनशीलता आणि पौष्टिक आहाराविषयी जागरूकतेला प्रोत्साहन मिळाले.
निखिल कानसे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचाल आणि भविष्यातील व्यावसायिक कारकिर्दीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पारितोषिक वितरण समारंभात पोस्टर प्रदर्शन, रांगोळी, आरोग्य प्रश्नमंजुषा, मेमरी क्विझ आणि सॅलड डेकोरेशन स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

उपक्रमामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाशी परिचित होण्याबरोबरच संवादकौशल्य, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि नर्सिंग व्यवसायाप्रती सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य, मान्यवर, प्राध्यापकवर्ग, आयोजन समिती आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षदा गोफणे आणि कु. सानिया शेख यांनी केले.

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथे लोकसहभागातून अन श्रमदानातून साकार होत आहेत स्थानिक रस्ते!!

Chief Editor

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या व धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या पंधराव्या पुण्यस्मरणनिमित्ताने लोणी (धामणी) येथे संपन्न झाले रक्तदान शिबिर !!

Chief Editor

एरोकोड कंपनीमध्ये समर्थ अभियांत्रिकी च्या ५ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

Leave a Comment