सामाजिक

करिअर डे ने उजळले समर्थ आय टी आय च्या विद्यार्थ्यांचे भविष्य 28 विद्यार्थ्यांची निवड !!

1009998795
1009998796


पंचनामा प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाची भरारी देणाऱ्या समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आय टी आय बेल्हे व टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम आयोजित करियर डे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरली. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, अत्याधुनिक तांत्रिक ज्ञान आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या बळावर तब्बल २८ विद्यार्थ्यांच्या निवडीने यशाचा मानबिंदू उंचावला.

समर्थ आय टी आय व टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारे ऑटोमॅटिव्ह बॉडी रिपेअर (डेटिंग) व ऑटोमॅटिव्ह पेंट रिपेअर (पेंटिंग) हे एक वर्षाचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे ठरत आहे. तांत्रिक शिक्षण विभाग व दिल्ली सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण उपकरणे व साधने, स्प्रे पेंटिंग उपकरणे च्या सहाय्याने प्रशिक्षण दिले जाते, तसेच उद्योगातील अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, आत्मविश्वास व उद्योगासाठी आवश्यक व्यावसायिक क्षमता विकसित होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल, सक्षम व रोजगारक्षम बनविणे हेच संस्थेचे ध्येय असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले

या करिअर डे मध्ये २८ विद्यार्थ्याची निवड झाल्याची माहिती प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी दिली या विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण आदित्य दिघे यांनी दिले.
निवड झालेले विद्यार्थी :
शॉ टोयोटा – ऑटोमोटिव्ह बॉडी रिपेअर (डेंटिंग) :
अविष्कार आहेर, साहिल चासकर, किरण चापुडे, अनिकेत डोके, गणेश डुंबरे, अनिकेत गोपाळे, देवदत्त इचके, प्रथमेश जाधव, सुजल कदम, सार्थक कोरडे, अजिंक्य लामखडे, शंतनू नायकोडी, प्रतीक तुपे.
शरयू टोयोटा – ऑटोमोटिव्ह बॉडी रिपेअर :
आलिम पठाण, आविष्कार साळुंखे.
शॉ टोयोटा – ऑटोमोटिव्ह पेंट रिपेअर :
मयुरेश जगताप, विवेक रोकडे, शंतनू विधाटे, जहिद शेख.
शरयू टोयोटा – ऑटोमेटिव्ह पेंट रिपेअर :
निखिल भांगरे, अजय काकडे, अजय माने, प्रथमेश मोरडे, ऋग्वेद नलावडे, शंकर सप्रे, सुमित हांडे, अविष्कार पोखरकर.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या त्रिवेणी संगमातून समर्थ आयटीआयचे विद्यार्थी आज उद्योगविश्वात आत्मविश्वासाने झेपावत असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी समर्थ आयटीआय यशाचा विश्वासार्ह मार्ग बनत आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

1009998794
1009850407

Related posts

“नवीन स्वप्नांना नवी दिशा, नव्या वाटचालीला नवी आशा”; समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत !!

Chief Editor

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली !!

Chief Editor

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र !!

Chief Editor

Leave a Comment