सामाजिक

विद्याधाम प्रशाला,लोणी येथे सभागृहाचे भूमिपूजन आणि गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न !!

1010001429

पंचनामा प्रतिनिधी – माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी व ग्रामपंचायत लोणीच्या सहकार्याने श्री भैरवनाथ विद्याधाम, लोणी येथे शाळेच्या समोरील प्रवेशद्वार व बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार समारंभ शनिवार, दि. 27 जून 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सकाळी 9:30 वाजता झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन महसूल विभाग, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सदस्या अंकिताताई वाळुंज, लोणी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनिल थोरात , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबीन मुंडे, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणीचे अध्यक्ष उदय वाळुंज आणि खजिनदार व उद्योजक बाळासाहेब गायकवाड आणि पारगाव पोलीस स्टेशनचे कांडगे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिक्षण आणि विकासावर भर
याप्रसंगी बोलताना कैलास गायकवाड यांनी माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “शाळेचा पायाभूत विकास आणि विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन एकत्रितपणे झाल्याने या उपक्रमाचे महत्त्व वाढले आहे”, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात इयत्ता 10वी व 12वी मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
पोलीस पाटील संदीप आढाव, उपसरपंच राजेंद्र वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य महिला भगिनी, शरद बँक संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच दिलीप वाळुंज, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज, बाळशिराम वाळुंज, चंद्रकांत गायकवाड, अरुण साकोरे, पिंटू पडवळ सुधीर सोनार, अनिकेत नाईक यांच्यासह शाळेचे शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती, पालक पत्रकार कैलास गायकवाड व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक दाते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज पाटील यांनी मानले.

1009948090
1009850407

Related posts

जारकरवाडी विविध कार्यकारी सोसायटीची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !!

Chief Editor

शेतकऱ्यांच्या थकबाकी रक्कमेत तफावतीसंदर्भात योजनेच्या पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी- सहकार आयुक्त दिपक तावरे

Chief Editor

वाफगाव येथील यशवंतराव होळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप !!

Chief Editor

Leave a Comment