सामाजिक

राज्यात ३-४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा;अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार !!

1010002496

पंचनामा प्रतिनिधी – राज्यात गत २४ तासांत दमदार पाऊस झाला असून, कोकणातील काही भागांत अतिवृष्टी ते मुसळधार, तर राज्यात सर्वदूर मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, राज्याला ३ आणि ४ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याने थांबलेला मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे जुलैची सुरुवात मुसळधार पावसाने होणार आहे. आज सोमवारी (दि.२९ जून) कोकणात अतिमुसळधार, तर उर्वरित भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. आगामी पाच दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्राला ३० जून ते ४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अशी आहे मान्सूनची स्थिती

महाराष्ट्र किनारपट्टीलगत पूर्व : मध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेली चक्रीय स्थिती कायम.

उत्तर मध्य : मध्य प्रदेशापासून सौराष्ट्र, उत्तर मराठवाडा ओलांडत अरबी समुद्रापर्यंत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ कि.मी. उंचीवर एक द्रोणीय रेषा तयार झाली.

1009948090
1009850407

Related posts

“उंचखडक येथील मुळे भावंडांनी गौरवग्रंथ आणि अभिष्टचिंतन सोहळ्यातून जागवल्या आईच्या आठवणी” !!

Chief Editor

हरिनामाच्या गजरात शिंगवे गाव दुमदुमले,आनंदवारी दिंडीने जपली वारकरी परंपरा !!

Chief Editor

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

Chief Editor

Leave a Comment