सामाजिक

पारगाव (शिंगवे ) येथे रमजान ईद उत्साहात संपन्न !!

img 20260321 wa0330

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (शिंगवे) येथील अंजुमन मस्जिद येथे सर्व मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन रमजान ईद चा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारगाव परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव अंजुमन मस्जिद येथे शिरखुरमा प्रसादासाठी उपस्थित होते.

ह्या एकत्रित सणासाठी १२० लिटर दूध आणि त्यासाठी लागणारा सुका मेवा २५ किलो वापरण्यात आला आणि गावातील २० मुस्लिम कुटुंबानी एकत्रित येऊन ह्या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच नियोजन केले होते.अंजुमन मस्जिद मध्ये ह्या कार्यक्रमाचे एकत्रित नियोजन केले होते.ह्या रमजान ईद सणानिमित्त पारगाव मधील व पंचक्रोशीतील २००-२५० ग्रामस्थानी ह्या प्रसादाचा लाभ घेतला.

ह्या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,पंचायत समिती सदस्य श्वेता ढोबळे,शरद बँक संचालक दौलत लोखंडे,मा उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे,पारगाव कारखाना पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे,ग्राम पंचायत सदस्य रोहिणी देवडे, किरण ढोबळे,काळूराम लोखंडे,बजरंग देवडे,श्रीकांत लोखंडे, बाळासाहेब लोखंडे,अनिल शेवाळे, अंजुमन मस्जिद चे अध्यक्ष जुबेर मणियार,बाबामिया इनामदार,चांद साब मणियार,युनूस पटेल,अश्पाक शेख,अमीर इनामदार,रमजान मनियार,शकील शेख,अकील शेख,जमीर शेख,साहिल आबितभाई आतार,फारुख मणियार,महेश देवडे,शंकर देवडे,ज्ञानेश्वर आडवळे,गोविंद पवार आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने अंजुमन मस्जिद चे रमजान मनियार व शकील शेख यांनी आभार मानले.

fb img 1773887068819

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे विज्ञानप्रदर्शन संपन्न !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत झाली डिजिटल !!

Chief Editor

श्री शिखर शिंगणापूर कावड यात्रेची त्रयोदशीला झाली सांगता; त्रीलिंगी वनदेव महादेव मंदिर शिरदाळे येथे प्रदक्षिणा घेऊन केली जाते यात्रेची सांगता !!

Chief Editor

Leave a Comment