सामाजिक

वाबळेवाडी शाळेच्या स्वरूप भागवतची अमेरिकेतील नासा स्पेस सेंटरला महत्त्वपूर्ण भेट !!

img 20260112 wa0410

पंचनामा शिक्रापूर प्रतिनिधी – आपल्या परिसरातील देशात गौरविली जाणारी पुणे जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी शाळेचा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी स्वरूप दादा भागवत या विद्यार्थ्यांने अमेरिकेतील प्रसिद्ध “नासा स्पेस सेंटर” तसेच “रॉकेट सायन्स सेंटर” ला भेट देत अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या शैक्षणिक भेटीद्वारे त्याने रॉकेटची रचना,अंतराळ मोहिमा, उपग्रहांचे कार्य,तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे सांगितले.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जगात भारतातील तरुण विद्यार्थांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी अशा भेटी मोठ्या प्रमाणात प्रेरणादायी ठरत असल्याचे नासा येथील मार्गदर्शकांनी सांगितले.स्वरूप दादा भागवत या विद्यार्थ्याने अंतराळवीरांनी वापरणारे विशेष कपडे,चंद्र मोहिमेतील ऐतिहासिक नमुने,विविध रॉकेट मॉडेल्स ,गुगल मेटा सेंटर कार्य शैली जाणून घेतली.भारतातील विविध शास्त्रज्ञ व विविध क्षेत्रात नामांकित असणाऱ्या तज्ञ व्यक्तींकडून तेथील यंत्रणा कशी चालते याविषयी माहिती घेतली.पुढे अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.या अभ्यासदौऱ्याच्या निवडीसाठी पोपट दरंदले सर व दिपक खैरे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच स्वरूपला कुटुंबियांचे आणि वर्गमित्रांचे विशेष सहकार्य लाभले.

fb img 1768108641525

विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल भविष्यवेधी शिक्षणाचे प्रणेते आदरणीय दत्तात्रेय वारे गुरुजी , शाळेचे मुख्याध्यापक विजय गोडसे सर,जयसिंग नऱ्हे सर तसेच शाळेतील सर्व आदरणीय शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ वाबळेवाडी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस स्वरूपला शुभेच्छा दिल्या आहेत .वाबळेवाडी शाळेच्या स्वरूप भागवतची अमेरिकेतील नासा स्पेस सेंटरला महत्त्वपूर्ण भेट

शिक्रापूर : आपल्या परिसरातील देशात गौरविली जाणारी पुणे जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी शाळेचा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी स्वरूप दादा भागवत या विद्यार्थ्यांने अमेरिकेतील प्रसिद्ध “नासा स्पेस सेंटर” तसेच “रॉकेट सायन्स सेंटर” ला भेट देत अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या शैक्षणिक भेटीद्वारे त्याने रॉकेटची रचना,अंतराळ मोहिमा, उपग्रहांचे कार्य, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे सांगितले.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जगात भारतातील तरुण विद्यार्थांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी अशा भेटी मोठ्या प्रमाणात प्रेरणादायी ठरत असल्याचे नासा येथील मार्गदर्शकांनी सांगितले.स्वरूप दादा भागवत या विद्यार्थ्याने अंतराळवीरांनी वापरणारे विशेष कपडे,चंद्र मोहिमेतील ऐतिहासिक नमुने,विविध रॉकेट मॉडेल्स ,गुगल मेटा सेंटर कार्य शैली जाणून घेतली.भारतातील विविध शास्त्रज्ञ व विविध क्षेत्रात नामांकित असणाऱ्या तज्ञ व्यक्तींकडून तेथील यंत्रणा कशी चालते याविषयी माहिती घेतली.पुढे अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. या अभ्यासदौऱ्याच्या निवडीसाठी पोपट दरंदले सर व दिपक खैरे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच स्वरूपला कुटुंबियांचे आणि वर्गमित्रांचे विशेष सहकार्य लाभले.

विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल भविष्यवेधी शिक्षणाचे प्रणेते आदरणीय दत्तात्रेय वारे गुरुजी, शाळेचे मुख्याध्यापक विजय गोडसे सर,जयसिंग नऱ्हे सर तसेच शाळेतील सर्व आदरणीय शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ वाबळेवाडी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस स्वरूपला शुभेच्छा दिल्या आहेत .

Related posts

महाराष्ट्र नाभिक महामंडळ,पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न !!

Chief Editor

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन !!

Chief Editor

समर्थ संकुलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment