सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला चिमुकल्यांचा आठवडे बाजार !!

img 20260214 wa0489
img 20260214 wa0493

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांचा आठवडे बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

img 20260214 wa0496
img 20260214 wa0489
img 20260214 wa0488
img 20260214 wa0491
img 20260214 wa0478

जिल्हा परिषद पुणे यांनी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बाल आनंद मेळावा घेण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रम संपन्न होत असतात. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी म्हणून आठवडे बाजार आयोजित करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक अशोक हिंगे सर यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

img 20260214 wa0471

या आठवडे बाजारात विविध प्रकारच्या भाज्या,फळ भाज्या,फळे,महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे विविध पदार्थ, इडली सांबार, फ्रुट चॅट, ओली भेळ,,आप्पे,मंचुरियन,डोसे,चहा, सरबत,ग्लास केक आदी पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या बाजारात तब्बल ११,९७०/- रुपयांची उलाढाल झाली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी शाळेत नेहमीच संस्कारक्षम उपक्रम राबवले जातात. दप्तराविना शाळा,परिसर अभ्यास, बोलक्या भिंती, जनरल नॉलेज वाढवण्यासाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शन, मातीची भांडी बनवणे,चित्रकला हे उपक्रम नियमितपणे सुरू असतात.

img 20260214 wa0477

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापक अशोक हिंगे, सहशिक्षिका हिंगे मॅडम,अंगणवाडी ताई लता लबडे, निर्मला पाचपुते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, पालक यांच्या माध्यमातून करण्यात आले.

img 20260213 wa0496

Related posts

कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने लोणी (ता.आंबेगाव) येथील ज्येष्ठ शेतिनिष्ठ शेतकरी गनिभाई हुसेन सय्यद सन्मानित!!

Chief Editor

हा रस्ता धुक्यात नव्हे तर धुळीत हरवला !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा !!

Chief Editor

Leave a Comment