सामाजिक

शिक्षक भरतीची मोठी घोषणा! १३ हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता आणि प्रक्रिया !!

1009723031

पंचनामा प्रतिनिधी – शिक्षण विभागात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षकांची तब्बल १३,००० पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, भरती प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

भरतीचे मुख्य तपशील –
एकूण जागा – १३,००० (प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक)

भरतीची पद्धत- ही भरती ‘पवित्र’ (Pavitra) पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने पारदर्शक स्वरूपात केली जाणार आहे.
आरक्षण- भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

पात्रता निकष –
उमेदवारांना खालील शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे:
१. प्राथमिक शिक्षक (इयत्ता १ ली ते ५ वी) १२ वी उत्तीर्ण + D.El.Ed. किंवा पदवी + D.El.Ed. आणि टीईटी (TET) पेपर-१ उत्तीर्ण.
२. उच्च प्राथमिक शिक्षक (इयत्ता ६ वी ते ८ वी) पदवी + B.Ed. आणि टीईटी (TET) पेपर-२ उत्तीर्ण.
३. माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षक संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (Post Graduation) + B.Ed. आणि अभियोग्यता चाचणी (TAIT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया कशी असेल?
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, भरती प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखली जाईल

पोर्टल नोंदणी – उमेदवारांना ‘पवित्र’ पोर्टलवर (https://www.rajyashikshakbharti.com) आपल्या प्रोफाईलचे अपडेट करणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया – अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) च्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
कागदपत्र पडताळणी – निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे संबंधित शिक्षण कार्यालयात तपासली जातील.

शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन –
“राज्यातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही भरती प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पूर्ण केली जाईल, जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक मिळतील.
(बातमी सोर्स – सहारा न्यूज)

1009722870
1009722705
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520

Related posts

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

Chief Editor

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

Chief Editor

उन्हाच्या झळा झाल्या तीव्र; आठवडे बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट !!

Chief Editor

Leave a Comment