सामाजिक

मोरडे फूड्स प्रा. लि.कंपनी मध्ये समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची निवड !!

img 20260404 wa0622

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे मोरडे फूड्स प्रा. लिमिटेड , या नामांकित कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह उत्साहात पार पडला.या मध्ये सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या कॅम्पस ड्राईव्हसाठी मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. विद्यार्थ्यांची निवड एटीट्यूड टेस्ट व एचआर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करण्यात आली, अशी माहिती कंपनीचे एचआर संतोष कुमकर यांनी दिली.

या निवड प्रक्रियेत मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागातून सना इब्राहिम पठाण व तन्मय सुनील शिंदे,तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून प्रतीक्षा महेंद्र आहेर , ओंकार बाबाजी उचले , विवेक कैलास लोकरे व समीक्षा अंकुश औटी या विदयार्थ्यांची निवड करण्यात आली.

img 20260404 wa0620

या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी कंपनीकडून हेरम्ब वाकडे (लीड टॅलेंट अक्विझिशन), शशांक जोशी (एचआर), संतोष कुमकर (सीनियर एचआर एक्झिक्युटिव्ह), शंकर गावडे (मॅनेजर इंजिनिअर) व साईनाथ विधाटे (मॅनेजर इंजिनिअर) उपस्थित होते.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल कपिले ,प्रा. संजय कंधारे तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर प्लेसमेंट यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेकॅनिकल विभाग प्रमुख संदीप त्रिभुवन सर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख महेंद्र खटाटे , आदिनाथ सातपुते,अकॅडमिक कोऑर्डिनेटर श्याम फुलपगारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट इन्चार्ज संकेत विघे, मोमीन सर, डावकर सर, शेळके मॅडम तसेच समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख प्रा.सचिन पोखरकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

fb img 1773887073740

Related posts

नवसाला पावणारी करवडीची जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगलताई !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे जलतारा उपक्रमाची सुरुवात !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील जेष्ठ आणि तरुणांच्या श्रमदानातून वटवृक्षाला बनवला ओटा !!

Chief Editor

Leave a Comment