सामाजिक

नाशिक पोलीस दलातून श्वान निताची सेवापूर्ती !!

img 20260405 wa0358

पंचनामा नाशिक प्रतिनिधी – डॉग स्कोड युनिट नाशिक सेवेतून नीताचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थित पार पडला.यावेळी निताचा सत्कार करण्यात आला.

डॉ प्रियांका जोपूळकर, डॉ संदीप पवार, डॉ किरण जाधव, डॉ वैशाली थोरात, सुनील गायकवाड, अनिल पगारे पोलीस डॉग युनिट हेड श्री कोल्हे यांनी नीताच्या तब्येतीची काळजी घेतली असून नाशिक शहर पोलीस दलात २०१६ साली दाखल झालेली श्वान निता अत्यंत कर्तव्यनिष्ठ योद्धा नाशिक पोलीस दलातून सेवामुक्त झाली असून गुन्हे शोधक श्वान निता – तब्बल ४८० गुन्ह्यांमध्ये घटनास्थळी उपस्थित राहून, अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात मोलाची भूमिका बजावत गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.

img 20260405 wa0359

पुणे, शिवाजीनगर येथे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर, श्वान निताने पोलीस कर्तव्य मेळावा सन २०१७, २०१८ मध्ये सहभाग घेत त्यानंतर सन २०१८ मध्ये आखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा (AIPDM) लखनऊ राज्य उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता त्यात श्वान निताने महाराष्ट्र राज्याला चॅपनशिप मिळुन देणेबाबत मोठा खारेचा वाटा उचला आहे.

श्वानाचा कार्यकाल पोलीस दलात १० वर्षाचा असून वयोमाना नुसार दिनांक ३१/०३/२०२६ रोजी श्वान निता नाशिक पोलीस दलातून सेवानिवृत्त झाली असून तिचे योगदान उल्लेखनीय राहिले.तिच्या सेवेबद्दल समस्त नाशिककराच्या वतीने आभार मानले असून तिला पुढील वैयक्तिगत आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक – संतोष पाचपुते

fb img 1773887068819

Related posts

समर्थ शैक्षणिक संकुलात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

युक्‍ती 2.0 स्टार्टअप आयडियाथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७६ संघांचा सहभाग !!

Chief Editor

गुड न्यूज – मान्सून पुन्हा सक्रिय होणार; २५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता;शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला !!

Chief Editor

Leave a Comment