सामाजिक

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा विकास करावा – ज्येष्ठ विधितज्ञ सतीषचंद्र सुद्रिक

1011537401
1011537398

समर्थ लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात !!

पंचनामा प्रतिनिधी – कायद्याचा अभ्यास करताना नियमित वाचन, सर्वांगीण ज्ञान आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वकील म्हणून काम करताना कल्पनाशक्तीचा विकास करून प्रत्येक प्रकरणाचा विविध अंगांनी विचार करावा. कोणतीही केस हाताळताना प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करावी, तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण न्यायनिवाडे काळजीपूर्वक अभ्यासावेत, असा सल्ला ज्येष्ठ विधितज्ञ ॲड. सतीषचंद्र सुद्रिक यांनी दिला.

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज, बेल्हे (बांगरवाडी), ता. जुन्नर येथे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी ते बोलत होते. न्यायालयीन कामकाजातील बदलांचा अभ्यास करून त्यानुसार कामकाजात सुसूत्रता आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

फौजदारी न्यायालयातील कामकाज प्रभावीपणे हाताळण्यासाठी वकिलांनी सर्वंकष अभ्यास करणे गरजेचे आहे. वकील हा केवळ न्यायालयीन कामकाजापुरता मर्यादित नसून त्याला समाजातील विविध क्षेत्रांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नवीन वकिलांनी या बाबी लक्षात घेऊन पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तसेच सामाजिक भान राखून आणि पक्षकाराच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून जबाबदारीने काम करावे, असेही ॲड. सुद्रिक यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. सुनील कवडे यांनी महाविद्यालयाची स्थापना, महाविद्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कायदेविषयक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर डॉ. राजीव सावंत, प्राचार्य डॉ. सुनील कवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा प्रदीप गाडेकर,ॲड. अंकिता सुद्रिक, ॲड. प्रेरणा भोसले आणि श्री. शिवाजी कुमकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. सचिन दरेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.पूजा दुग्गड यांनी करून दिला, तर श्री. शिवाजी कुमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 399503

Related posts

जनहित पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेची इयत्ता दहावीच्या यशाची परंपरा कायम !!

Chief Editor

Leave a Comment