
पंचनामा प्रतिनिधी – आदर्श गाव गावडेवाडी (ता आंबेगाव ) येथील जनहित बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता .२१) रोजी पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन बाळकृष्ण गावडे यांचे अध्यक्षतेखाली पांडुरंग मंदिरात संपन्न झाली.
गावातील पांडुरंग मंदिरात संपन्न झालेल्या या सभेचे प्रास्ताविक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश भोर यांनी केले विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता निघोट व अंतर्गत लेखा परीक्षक लक्ष्मण पिंपळे यांनी केले.यावेळी सभासदांना १२ % टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष जनार्दन बाळकृष्ण गावडे यांनी सांगितले.
सभेच्या चर्चेमध्ये हिरकणी विद्यालयाचे संचालक अशोक डोंगरे,गावडेवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळू चिमाजी गावडे , शामकांत शिंदे सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र रघुनाथ गावडे आदींनी चर्चेत भाग घेतला.
या वेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली जनहित संस्थेचे सर्व सभासद संचालक लेखापरीक्षक अशोक गावडे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.या वार्षिक सभेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मनोज निघोट,कोमल कराळे,सोनल गावडे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सर्वांचे आभार तज्ञ संचालक आनंदराव रामचंद्र गावडे (काका गुरुजी )यांनी मानले


