सामाजिक

जवळे ( ता.आंबेगाव) येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबीर संपन्न !

1009537259

जवळे ( ता.आंबेगाव) येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबीर संपन्न !

“शेती ही केवळ व्यवसाय नाही, तर ती संस्कृती, विज्ञान आणि भविष्यतील समृद्धीचा पाया आहे.”

शेतकऱ्यांना शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन !!

📍 जवळे (ता. आंबेगाव, जि. पुणे)
पंचनामा प्रतिनिधी – शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जवळे (ता.आंबेगाव, जि. पुणे) येथे विशेष कृषी मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात कृषीविद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध शेतीविषयक माहिती दिली.जवळे
ग्रामपंचायच्या आदर्श सरपंच/प्रशासक सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील तसेच श्री. उत्तम शिंदे, हरिचंद्र शिंदे पोपटराव शिंदे, रघुनाथ वाळुंज, जालिंदर लायगुडे,रघुनाथ सोनवणे,बबनराव लोखंडे,शाशिकला गावडे यश वाळुंज यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली कृषीविद्यार्थ्यांनी गावामध्ये विविध कृषी जनजागृती व मार्गदर्शनात्मक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले.

कार्यक्रमामध्ये पीक पद्धतींचा अभ्यास, संकरित बियाणांची निवड, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर, कीड व रोग नियंत्रण, तसेच पाण्याच्या बचतीसाठी आधुनिक सिंचन तंत्र यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिला शेतकऱ्यांना शेतीमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी, पुणे या महाविद्यालयातील कृषीविद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावाला भेट दिली.

यावेळी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन व शाश्वत शेती कशी साध्य करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान गावातील शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी कृषीविद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात अशा उपक्रमांची अधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी गावातील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण होऊन नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले.
महाविद्यालय व पदाधिकारी

  • महाविद्यालयाचे नाव :
    डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी, पुणे.
  • प्राचार्य :
    प्रो. एम. डी. जगताप
  • समन्वयक :
    प्रो. एस. एन. पाटील
  • कृषी व्यवसाय तज्ञ अधिकारी :
    प्रो. वैशाली घोलप मॅडम
    कृषीकार्यांचा गट
  • प्रिया घाटोळ
  • श्रुतिका जाधव
  • अनुष्का हांडे
  • सोनिया दुधगावकर
  • रजनंदिनी वागज
  • तनिशा फुलसुंदर
  • सुहानी मोरे
  • कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश

🌱 शेती तंत्रज्ञानाचा प्रसार

आधुनिक शेती तंत्रज्ञान व पद्धतीची माहिती देणे.

🌾 उत्पादकता वाढविणे

पीक उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

💧 संसाधनांचा योग्य वापर

पाणी, माती व इतर संसाधनांचा शाश्वत वापर.

👩‍🌾 महिला सशक्तीकरण

महिला शेतकऱ्यांना शेतीमध्ये सक्रिय सहभागासाठी प्रेरित करणे.

🏛️ शासकीय योजनांची माहिती

शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देणे.

🌿 “जमिनीवर घाम गाळणारा शेतकरीच देशाच्या प्रगतीचे खरे बीज पेरत असतो.” 🌿

1009537259
fb img 1774661444136

Related posts

शरद सहकारी बँकेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी विठ्ठल सिताराम ढोबळे यांचा सन्मान !!

Chief Editor

लेण्याद्री येथे ऐतिहासिक स्थळे संवर्धन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

शाहीरी भुलली अभंगाला…राजा पाटील (बापू) कवठे महांकाळकर

Chief Editor

Leave a Comment