सामाजिक

पारगाव (दत्तात्रयनगर) येथील गट क्रमांक ३५४ मध्ये भारतीय जनगणनेला सुरुवात !!

1009530229
1009530229

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (दत्तात्रयनगर) येथील गट क्रमांक ३५४ मध्ये भारतीय जनगणनेला सुरुवात करण्यात आली.

या जनगणनेत घरगणना व घरीयादी जनगणनेचे चार टप्पे करण्यात आले असून त्याचा कालावधी १६ मे १४ जून २०२६ असा असणारा असल्याची माहिती आंबेगाव तालुका तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांनी दिली.

या टप्प्यात घरांची स्थिती,वापर आणि उपलब्ध सुविधांबाबत सुमारे ३३ ते ३५ प्रश्न विचारले जातात.

दुसरा टप्पा लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या,कुटुंब प्रमुखांची माहिती,शिक्षण,व्यवसाय आणि इतर तपशील गोळा केले जातात.

जात जनगणना १९३१ नंतर प्रथमच या जनगणनेत जातीनिहाय गणनेचा (जात प्रवर्ग) समावेश करण्यात आला आहे.आर्थिक व सामाजिक माहिती उप्नन्नाचे स्रोत आणि मुलभूत सुविधाविषयी प्रश्न विचारले जातात.जनगणनेच्या अंतिम आकडेवारी नंतर महाराष्ट्राची अचूक नवीन लोकसंख्या समोर येईल.

पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव येथील सुपरवायजर विजय वळसे सर संपूर्ण पारगावचे काम पाहत आहेत.तसेच प्रगणक चिचगाई मळा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव मोनिका नाटे जनगणनेचे काम करत आहेत.

यावेळी सोनमाळ खंडोबा विट सप्लायर्स चे मालक सचिन ढोबळे,प्रगतशील शेतकरी भागचंद ढोबळे, मनोज ढोबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

fb img 1774661449199

Related posts

शिरदाळे येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपचा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप !!

Chief Editor

उन्हाच्या झळा झाल्या तीव्र; आठवडे बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट !!

Chief Editor

जुन्नर तालुक्यातील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अभिमानास्पद यश — GPAT व GATE 2026 मध्ये दमदार कामगिरी !!

Chief Editor

Leave a Comment