
पंचनामा प्रतिनिधी – लोणी( लोणी. आंबेगाव ) : येथील आठवडे बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असले, तरी बाजारात ग्राहकांची अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. बैलपोळा अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बैलांच्या सजावटीचे साहित्य, गोंडे, रंग, दोर, घुंगरू यांसह विविध वस्तू विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी आणल्या आहेत.मात्र, ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, घटस्थापनेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने घटाचे साहित्य, पूजाविधीसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच इतर पूजासाहित्य विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली विक्री होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे.
सण जवळ आले असतानाही ग्राहकांची गर्दी नसल्याने व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला असून, आगामी दिवसांत तरी बाजाराला चांगली चालना मिळेल का, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


विक्रीसाठी मातिचे बैल, बैलांचे साहित्य,घटाचे साहित्य


