सामाजिक

विनोद व अभिनयसम्राट तमाशाफडमालकमा. वसंतराव विश्वासराव नांदवळकर….

1009623681

पंचनामा प्रतिनिधी – तमाशा क्षेत्रातील अतिशय अनुभवी व कलासंपन्न व्यक्तिमत्त्व व तमाशा कला कशी सादर करायची याचे परिपूर्ण ज्ञान मा. वसंतराव नांदवळकर यांना असल्याकारणाने रसिकांच्यावर मोठा प्रभाव पाडू शकतात. रंगबाजी पासून ते वगनाट्यापर्यंत प्रमुख भूमिकेत ते स्वतः असतात. नांदवळकर तमाशा फड यशस्वी चालवण्यासाठी मा.वसंतराव नांदवळकर यांचे योगदान बहुमूल्य आहे. ज्ञान व अनुभवाचा त्यांनी योग्य वापर केलेला दिसतोय.

मा.वसंतराव नांदवळकर यांचे तमाशाफडात अतिशय बारकाईने लक्ष, सादर होणाऱ्या कार्यक्रमावर अतिशय बारकाईने लक्ष असते. त्यामुळे नांदवळकर तमाशा फड यशस्वी होऊन उंच शिखरावर जाऊन बसलेला आहे. मालकच मध्यवर्ती भूमिकेत असल्याकारणाने इतर कलावंतावर उत्कृष्ट कला सादर करण्याची जबाबदारी पडते.
नांदवळकर तमाशाफडात अतिशय शिस्त, कलाप्रेम व कलानिष्ठ, कलावंतांना योग्य तो मानसन्मान ,योग्य कला सादरीकरण व उत्कृष्ट मॅनेजमेंट ही मा. वसंतराव नांदवळकर यांचे अप्रतिम कौशल्य जाते. लोकशाहीर साहेबांना नांदवळकर असल्यापासून ते आजपर्यंत नांदवळकर तमाशा फडामध्ये
प्रबोधन ,विनोद आणि वगनाट्याला यांना अतिशय महत्त्व दिले जाते. तिथे कुठेच कमी पडत नाहीत.त्यामुळे कार्यक्रम दर्जेदार होतो.

तमाशा कला पंढरी काळज मॅनेजर यांच्या पाहुणेवाडी या.बारामती येथील दिनांक २३/५/२०२६ रोजी झालेल्या मिटिंगमध्ये,मा. वसंतराव नांदवळगावकर यांनी अतिशय बहुमूल्य विचार मांडले, तमाशाफड मालकांनी स्वतःहून सर्व गोष्टीत लक्ष घातले पाहिजे, कोणावरही अवलंबून नसले पाहिजे.
महाशिवरात्रीपासूनच तमाशाच्या राहुट्या सुरू केल्या पाहिजेत. तमाशा फडाच्या एका गावातून दुसऱ्या गावांमध्ये वेळेवरच गाड्या गेल्या पाहिजेत.
याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
अध्यक्षपदासाठी काळज जवळची व भरपूर वेळ देणारी व्यक्ती पाहिजे. मा.वसंतराव नांदवळकर यांना बाहेर गावच्या कार्यक्रमामुळे स्वतः भरपूर वेळ देत नसल्याकारणाने सर्वांची ईच्छा असून देखील अध्यक्षपदासाठी त्यांनी नकार दिला. हे खूप मनाचे मोठेपण आहे.

माणसाला जगताना स्वतःच्या जवळ असलेला परिस लवकर दिसत नाही ,
यामुळे गती ,प्रगती ,अधोगतीचे चक्र चालू असते. मा. वसंतराव नांदवळकर यांना स्वतः जवळचा लवकर परीस दिसला आणि त्यांनी तो परिस्पर्श नांदवळकर तमाशा फडाला केला आणि तमाशा फडाचे सोने केले.फडातील सर्व नातेवाईक, बाहेरचे कलावंत, आणि आदरणीय गुरुवर्य बोडरेगुरुजी या सर्वांचा मेळ साधण्यासाठी मा. वसंतराव नांदवळकर यशस्वी झालेले दिसतात.

कलाजीवन जगत असताना सर्वांचेच विचार एकामेकांना पटतात असे नसते. पण जो एकविचार व कलाविचार असतो तो एकविचार व कलाविचार तमाशाफडासाठी, कलावंतासाठी उपयुक्त असतो ,तोच एकविचार व कलाविचार मा.वसंतराव नांदवळकर व त्यांचे संपूर्ण नांदवळकर कुटुंबात रूजलेला
दिसतोय ,याचा अभिमान वाटतो.

पटलं तर..
राजेंद्र ‌.डी. मोरे बारामती

संपादक – श्री. संतोष बापू पाचपुते ८८८८५०९७००

1009623486

Related posts

एस.आय.आर कार्यक्रमाचा केंद्रीय उपनिवडणूक आयुक्तांकडून आढावा

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे विज्ञानप्रदर्शन संपन्न !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल !!

Chief Editor

Leave a Comment