सामाजिक

समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे आणि फिलिपिन्सच्या कॅटबालोगन सिटी कम्युनिटी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार !!

1011623389
1011623391

विद्यार्थी व प्राध्यापकांच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीचा मार्ग मोकळा; संशोधन, प्रशिक्षण आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला मिळणार चालना

पंचनामा प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे (ता. जुन्नर, जि. पुणे) आणि फिलिपिन्स देशातील कॅटबालोगन सिटी कम्युनिटी कॉलेज यांच्यामध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करारावर फिलिपिन्स येथील कॅटबालोगन सिटी कम्युनिटी कॉलेज चे अध्यक्ष डॉ. निगेल एल कॉर्नजो आणि समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य प्रा.डॉ.नवनाथ नरवडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी युवा शास्त्रज्ञ डॉ प्रतीक मुणगेकर, प्रा. रतिलाल बाबेल, प्रा. तानाजी वामन,समर्थ कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सचिन पोखरकर उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारामुळे दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होणार असून विद्यार्थी व प्राध्यापकांची आंतरराष्ट्रीय स्तरावर देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे.

या करारांतर्गत दोन्ही संस्थांमधील प्राध्यापकांना अल्पकालीन अध्यापनासाठी संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर किंवा शैक्षणिक वर्षाच्या कालावधीतील विद्यार्थी विनिमय कार्यक्रम राबविणे, संयुक्त संशोधन प्रकल्पांना चालना देणे, संशोधन निष्कर्षांची देवाणघेवाण करणे तसेच आंतरराष्ट्रीय परिषद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करणे यावर भर देण्यात येणार आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप, औद्योगिक भेटी, व्यावसायिक कौशल्य विकास कार्यक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक जर्नल्स, संशोधन प्रकाशने,अध्यापन साहित्य आणि इतर शैक्षणिक साधनसामग्रीची देवाणघेवाण करण्यासाठीही सहकार्य केले जाणार आहे.

विशेष म्हणजे, या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वातावरणाचा अनुभव घेण्याची, जागतिक स्तरावरील शैक्षणिक पद्धती समजून घेण्याची आणि संशोधन व व्यावसायिक क्षेत्रातील नवीन संधींचा लाभ घेण्याची दिशा मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दृष्टिकोन, संवादकौशल्य, संशोधनवृत्ती आणि व्यावसायिक क्षमता विकसित करण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची स्थापना २००७ मध्ये ग्रामीण भागातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके आणि विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या शैक्षणिक चळवळीने आज १४ विविध प्रकारच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून ५,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक सहकार्याचे नवे दालन खुले करणारा हा सामंजस्य करार समर्थ संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या उपक्रमामुळे समर्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देशाच्या सीमांपलीकडे जाऊन ज्ञान, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. वसंतराव शेळके, उपाध्यक्ष श्री. माऊली शेठ शेळके, सचिव श्री. विवेक शेळके, विश्वस्त श्री. वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके आणि कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमाचे स्वागत करून संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.

1011605851
1011605849

Related posts

जांभोरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

सूर्य शक्ती प्रकल्पांतर्गत शेतीस उपयुक्त सौर व तांत्रिक साहित्याचे लाभार्थ्यांना वितरण !!

Chief Editor

समर्थच्या विद्यार्थ्यांची MHT-CET (PCB) परीक्षेत यशाची सुवर्णझेप !!

Chief Editor

Leave a Comment