सामाजिक

ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतिकारक राघोजी भांगरे व लायन हार्टेड होनाजी केंगले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी; आदिवासी बांधवांना दिवाळी साहित्य व फराळाचे वाटप !!

1011625669
1011625673

नांदूरकीचीवाडी (जांभोरी) : ग्रामविकास प्रतिष्ठान, नांदूरकीचीवाडी (जांभोरी), ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या वतीने आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे व लायन हार्टेड होनाजी केंगले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

1011625562

यावेळी आदर्श शिक्षक किसन गिरंगे व सामाजिक कार्यकर्ते भीमा केंगले यांनी उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन केले. क्रांतिकारकांच्या जीवनकार्याचा, त्यागाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.

यावर्षी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने नांदूरकीचीवाडी, माळवाडी, बांबळेवाडी व केंगलेवस्ती येथील नागरिकांना दिवाळी साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमासाठी श्री. चंद्रकांत लोहकरे साहेब व श्री. शरद बांबळे साहेब यांनी विशेष सहकार्य केले. व युट्युब लाईव्ह दिनेश गिरंगे व निलेश यांनी केले

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोहर केंगले गुरुजी यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गिरंगे यांनी केले आभार ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अंकुश केंगले यांनी मानले

1011625669

याप्रसंगी हनुमंत गिरंगे, संजय केंगले, नवनाथ केंगले (पोलीस पाटील), बबन केंगले (उपसरपंच), विलास केंगले (माजी उपसरपंच), प्रमोद केंगले (माजी उपसरपंच)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले., मनोहर केंगले गुरुजी. सुनिल गिरंगे.संतोष भवारी सर.बाळू केंगले सर यांच्यासह ग्रामस्थ व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतिकारकांच्या विचारांना अभिवादन आणि गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.

1011605849

Related posts

हरवले आहेत – श्री.एकनाथ देवराम सुक्रे (आचारी) वय ६० वर्ष राहणार खडकवाडी, लोणी ता.आंबेगाव,जिल्हा पुणे

Chief Editor

ग्रामीण विकास केंद्र, जामखेडतर्फे लोककलावंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

शेवभाजी…..!!

Chief Editor

Leave a Comment