सामाजिक

वेदांत डेअरीच्या दूध उत्पादकांची दिवाळी बोनसने गोड ; जारकरवाडीत दूध उत्पादकांना दीपावलीनिमित्त बोनसचे वाटप ; दूध व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या हातात खेळता पैसा !!

1011618183

पंचनामा प्रतिनिधी जारकरवाडी (ता. आंबेगाव) : येथील वेदांत डेअरीच्या वतीने दीपावली सणाचे औचित्य साधून वर्षभर नियमित दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना (गवळ्यांना) बोनसचे वाटप करण्यात आले. डेअरीच्या या उपक्रमामुळे दूध उत्पादकांची दिवाळी अधिक गोड झाली असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

वर्षभर मेहनत घेऊन डेअरीला नियमित दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांच्या योगदानाची दखल घेत वेदांत डेअरीच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त बोनस देण्याची परंपरा जपली जात आहे. या बोनसच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळत असून, त्यांच्या कष्टाचा सन्मानही केला जात आहे.

दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळेच डेअरीची प्रगती होत आहे. त्यांच्या कष्टाला आणि योगदानाला महत्त्व देत दीपावलीनिमित्त बोनसचे वाटप केले जाते. दूध उत्पादक आणि डेअरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे, अशी माहिती वेदांत डेअरीचे चेअरमन खंडू लबडे यांनी दिली.

दरम्यान, जारकरवाडी गावाला बारमाही पाणी उपलब्ध असल्याने गावात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाची कास धरली आहे. दूध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळत असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. त्यामुळे गावातील शेतकरी समाधानी असल्याचे सोसायटीचे संचालक अशोक धानापुने यांनी सांगितले.

दुग्धव्यवसायाला बोनसची जोड, शेतकऱ्यांच्या दिवाळीत आनंदाची भर!

1011605849
1011605848

Related posts

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे (पारगाव ) शाळेचे पाच विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होणार अखंड हरिनाम सप्ताह!!

Chief Editor

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात विविध उपक्रमांचे नियोजन !!

Chief Editor

Leave a Comment