सामाजिक

बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पारगाव (कारखाना) पोलिसांनी जेरबंद करून एकुण ३७ प्लेटा केल्या जप्त;पारगाव पोलीसांची उत्तम कमगिरी !!

1009824498

पंचनामा प्रतिनिधी – दि. १६/०४/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० ते दि. १७/०४/२०२६ रोजी सकाळी ०७:०० वा. चे दरम्यान मौजे नागापूर मिंडेवस्ती ता. आंबेगाव जि.पुणे येथून फिर्यादी यांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या २२,२००/— रूपयाच्या एकुण ३७ लोखंडी प्लेटा चोरीस गेले बाबत पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेवरून पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. ६३/२०२६ भा.न्.सं.२०२३ कलम ३०३(२) प्रमाणे दिनांक १२/०६/२०२६ रोजी २०:०६ वा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन कांडगे सो. सहा. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे, पोलीस अंमलदार मंगेश अभग, पोलीस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सपोनि कांडगे सो. यांना गोपनीय बातमीदारामारत देवगाव येथे काठापर बु।। फाटयवर एक इसम चारचाकी गाडीमध्ये चोरीचा माल घेवुन येत असल्याची गोपनीय बतमी मिळाल्याने त्यांनी सदर माहिती वरील तपास पथकस देवुन पुढील कारवाही करणे बाबत आदेश दिल्याने तपास पथक देवगाव गवचे हद्दीत काठापूर बु।। फाटयावर एक संशईत पढरे रंगाचा छोटा हत्ती वाहन येताना दिसले त्यास त्यांनी थबवुन पाहणी केली असता गाडीमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेटा मिळून आल्या तेंव्ह सदर चालकास त्याचे नव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अतिश दिलीप गव्हाणे वय १९ वर्षे रा.कवठे येमाई ता.शिरूर जि.पुणे मुळ रा.कोहकडी ता.पारनेर जि. अहल्यानगर असे असल्याच सांगितले तसेच सदर वाहन व प्लेटांबाबत विचारना केली असता त्याने सदरच्या लोखंडी प्लेटा त्याचा मित्र रतन मांगीलाल राठोड रा.पारगाव ता.आंबेगाव जि.पुणे याचे सोबत नागापूर येथून चोरी केल्या असल्याचे सांगितले आहे.सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या २२,२००/— रू एकुण ३७ लोखंडी प्लेटा त्याचेकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कामगिरी म.संदीप सिंह गल्ल सो, पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, श्री. शुभम कुमार सो, अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, मा.अमोल मांडवे सो, म.उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग, खेड यांचे मर्गदर्शनाखाली श्री.सचिन कांडगे सहा.पोलीस निरीक्षक पारगाव का. पोलीस ठाण, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, पोलीस मित्र रामदस वाळुंज यांन केली.

1009790278
1009793449

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील मा. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढोबळे यांच्या वतीने शिवभक्तांसाठी १२ कॅन भरून मसाला दुधाचे वाटप !!

Chief Editor

रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार लोणी मॅरेथॉन २०२६ !!

Chief Editor

समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आचार्य सुश्रुत जयंती व महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

Leave a Comment