सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी येथे ‘प्रवेश उत्सव’ उत्साहात;डीजेच्या तालावर पहिलीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक!!

1009824644

पंचनामा प्रतिनिधी – ​जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा ‘प्रवेश उत्सव’ अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

सुट्ट्यांनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली असून, पहिल्याच दिवशी नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करून त्यांना शालेय प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

​सकाळी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या वतीने शाळेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शाळेत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भारतीय संस्कृतीनुसार कुंकू लावून व औक्षण करून स्वागत करण्यात आले. विशेषतः यंदा शाळेत दाखल झालेल्या पहिलीच्या लहानग्या विद्यार्थ्यांना पारंपरिक फेटे बांधण्यात आले होते, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता.प्रवेश उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक !! डीजेच्या तालावर आणि ढोल-ताशांच्या गजरात गावातून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या लाडक्या चिमुरड्यांना फेटे घालून मिरवताना पाहून ग्रामस्थांनीही त्यांचे कौतुक केले.

1009824643

मिरवणुकीनंतर शाळेच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची शासकीय मोफत पाठ्यपुस्तके आणि सुंदर गणवेशाचे वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके आणि गणवेश हातात पडताच विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले.

या प्रसंगी पंचायत समिती सदस्या श्वेताताई ढोबळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन दातखिळे, उपाध्यक्ष निलेश हरिहर,शंकर देवडे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे,विवेक चव्हाण,नितीन ढोबळे,बाळा अडवळे , किसनराव ढोबळे,शिवाजी लोखंडे सर, सांगोलकर सर, साईनाथ गायकवाड, अजित दातखिळे गणेश देवडे यांच्यासह गावातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक आणि पालकांची मोठी उपस्थिती होती.

​यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्या श्वेताताई ढोबळे यांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.

​कार्यक्रमाचे नेटके नियोजन शाळेचे मुख्याध्यापक संतोष लबडे,शिक्षक प्रतिभा शिंगाडे,लीना कासार,स्वाती सोनवणे,मोनिका नाटे,सुजाता चिखले, विजय वळसे यांनी केली वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले. शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

1009792054
1009760330

Related posts

समर्थ संकुलामध्ये ऊर्जा बचत व व्यवस्थापन-एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

कान्हूर मेसाई येथे जिल्हास्तरीय शालेय भजन व गौळण स्पर्धेचा भक्तिरसात रंगलेला सोहळा संपन्न!!

Chief Editor

Leave a Comment