सामाजिक

भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या संपन्न !!!

1010755572
1010755572

पंचनामा प्रतिनिधी – भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.लांडेवाडी-चिंचोडी संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोरया मंगल कार्यालय, लांडेवाडी येथे खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित सभासद व संचालक मंडळाशी संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.खा.शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील संवाद साधला.

1010755586

संस्थेने गेल्या ३७ वर्षांत सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भविष्यातही पारदर्शक, विश्वासार्ह आणि सभासदकेंद्री कारभाराच्या माध्यमातून संस्थेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती, ठेवी व कर्जवाटप तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रमेश खरमाळे यांनी सभासदांसमोर मांडली.

1010748781

यावेळी संस्थेच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सभासदांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील संस्थेच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. सभासदांनी विविध विषयांवर सूचना व मते मांडली. या चर्चेत संस्थेचे मा.सचिव खंडेराव आढळराव, विश्वासराजे थोरात, नारायण निघोट, सुनील बाणखिले यांनी सहभाग नोंदविला.

भैरवनाथ पतसंस्थेने देखील या आधुनिक तंत्रज्ञानुसार ऑनलाइन व्यवहारांना अधिक महत्त्व दिलेले असून ऑनलाइन व्यवहारांसाठी सभासदांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष सागर काजळे यांनी केले.

1010755578

यावेळी ‘कोन बनेगा करोडपती’ विजेती रुचिता आढळराव पाटील, सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केलेल्या कार्याबद्दल खडकवाडी गावचे मा. सरपंच अनिल डोके यांना भैरवनाथ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जनता अपघात विमा योजना अंतर्गत 3 सभासदांच्या वारसांना आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

सभेला संस्था संचालक सौ.कल्पना आढळराव पाटील, महेश ढमढेरे, हनुमंत तागड, भिकाजी बोकड, रामशेठ तोडकर, अभिमन्यू लांडगे, तज्ञ संचालक अशोक गव्हाणे, तज्ञ संचालक अंजली थोरात, पालक संचालक रामदास पवळे , पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, माजी पंचायत समिती सदस्य रविंद करंजखेले, लांडेवाडीच्या सरपंच संगीता शेवाळे, अपूर्व आढळराव, तानाजी शेवाळे, दत्ता कोकणे, शाम गुंजाळ, भाऊ सावंत, इंद्रजीत जाधव सर, संस्थेचे सेवक तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

1010755579
1010748757

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाचपुते यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार संचालक रामशेठ तोडकर यांनी मानले.

1010748783
1010748777

Related posts

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!

Chief Editor

हजार लीटर दूधात शाम्पू, दूध पावडर आणि केमिकलचं ५०० लीटर पाणी;भेसळ खोरांचा पर्दाफाश !!

Chief Editor

आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न, निश्चित ध्येय असल्यास यश निश्चित – लेफ्टनंट तुळशीराम देवराम आदक

Chief Editor

Leave a Comment