सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात भक्तीभावाने संपन्न झाला महाशिवरात्रीचा सण !!

img 20260215 wa0429
img 20260215 wa0474

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील लोणी,धामणी,पारगाव,जारकरवाडी, पहाडदरा,शिरदाळे गावांत शंभू महादेवाच्या मंदिरात अभिषेक व विधिवत पूजा संपन्न होत महाशिवरात्रीचा सण मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

img 20260215 wa0427

जारकरवाडी येथील झांजुरणेबाबा येथील काशी विश्वेश्वर,विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांच्या उपस्थित शंभू महादेवाच्या पिंडीवर दुग्धभिषेक करण्यात आला.बेलाचे पान,बेलाचे फळ,धोत्र्याचे फुल,भस्म वाहून पूजा संपन्न करण्यात आली.

img 20260215 wa0424

जारकरवाडी येथील झांजुरणे बाबा व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांच्या माध्यमातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी,केळी,राजगिरा चिक्कीच्या प्रसादाचे वाटप करण्यात
आले. तर धामणी येथे महाशिवरात्री निमित्ताने कीर्तनसेवा संपन्न झाली.

img 20260215 wa0431

लोणी,धामणी, पहाडदरा, शिरदाळे येथील महादेवाच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. बहुतांशी मंदिरात पहाटे अभिषेक सोहळा संपन्न झाला. विधिवत पूजा व आरती संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आली होती.

img 20260215 wa0428

आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल घडले आहेत. जग मोठ्या प्रमाणात बदलले आहे.काल लागलेला शोध आज कालबाह्य होताना दिसून येतो आहे. जग कितीही झपाट्याने बदलत असले तरी लोकांनी अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मान्य केले आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत असून या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातूनच सर्वसामान्य लोकांचा अध्यात्मिक व वैज्ञानिक विकास होणार असल्याची भावना यावेळी भाविकांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.

img 20260213 wa0496

Related posts

आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपणचं जपलं पाहीजे”

Chief Editor

हजार लीटर दूधात शाम्पू, दूध पावडर आणि केमिकलचं ५०० लीटर पाणी;भेसळ खोरांचा पर्दाफाश !!

Chief Editor

औद्योगिक कौशल्य वृद्धीसाठी सामंजस्य करार; समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment