सामाजिक

ग्रामपंचायत जवळेचा आदर्श उपक्रम; गावात केली प्लास्टिक बंदी !!

img 20260415 wa0213

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायत राज व माझी वसुंधरा अभियानाचे निमित्त साधून गावामध्ये प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली.

यामध्ये प्लास्टिक ग्लास,प्लास्टिक पत्रावळे, 50 मायक्रॉनच्या आतील प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे, प्लेट थर्माकोल इत्यादी साहित्यांवर शासकीय नियमानुसार बंदी करण्यात आलेली आहे.

गावामधील सर्व आस्थापने यांनाही 50 मायक्रॉनच्या आतील प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी करण्यात आली आहे.यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने महिला भगिनींसाठी प्लास्टिक पिशव्या संकलन करून ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.यासाठी महिला भगिनींना पहिल्या तीन क्रमांकासाठी तीन पैठणी बक्षीस ठेवण्यात आलेल्या आहेत अशी घोषणा जवळे गावच्या आदर्श सरपंच /प्रशासक सौ वृषाली उत्तम शिंदे पाटील यांनी व प्रशासकीय समितीने केली.

img 20260415 wa0195

ग्रामपंचायत जवळे नवनवीन उपक्रम राबवणे मध्ये नेहमीच आघाडी वरती आहे. मार्गदर्शन आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज मॅडम व विस्तार अधिकारी श्री हुजरे सर यांचे मिळत असते असे सरपचं सौ.शिंदे यांनी सांगितले.

अनेक महिला भगिनींनी सहभाग घेतला. यामध्ये सौ.संध्या दिनकर वाळुंज, सौ.वैशाली श्रीकांत वायकर, सौ.सुनीता नारायण तांबे, यांनी नंबर पटकवला. त्यांना प्रत्येकी १ मानाची पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.

fb img 1774661444136

यावेळी सौ.मनीषा टाव्हरे, चंद्रकला गायकवाड,शुभांगी खालकर,प्रमिला गावडे, संगीता साबळे, शालन सोनवणे, पूजा शिंदे, प्रमिला खालकर,ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे यांसह महिला भगिनी उपस्थित होत्या.अशी माहिती सरपंच वृषाली ताई शिंदे पाटील यांनी दिली.

Related posts

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट खलनायक श्री. संभाजीराव कोल्हे

Chief Editor

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड !!

Chief Editor

मंदिरात रोख रक्कम दान करण्याच्या बहाण्याने महिलेचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले !!

Chief Editor

Leave a Comment