सामाजिक

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुनील थोरात यांना राज्यस्तरीय ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर !!

1010887371

पंचनामा प्रतिनिधी – शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील थोरात सर यांची राज्यस्तरीय ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६)’ निवड करण्यात आली आहे.ऋग्वेद् हेल्थ बारामती फाऊंडेशनच्या वतीने या राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री सुनील थोरात सर यांनी शिक्षण, संस्कार, प्रगती आणि समाजसेवा या मूल्यांना प्राधान्य देत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

त्यांच्या या यशाबद्दल लोणी परिसरामध्ये आनंदाचे वातावरण असून, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी आणि समस्त ग्रामस्थ लोणी यांच्या वतीने सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला धूलिवंदन सण;वीरांच्या मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा कायम !!

Chief Editor

एक जिगरबाज तमाशा फडमालकीन- छायाताई खिलारे बारामतीकर !!

Chief Editor

जारकरवाडी फाटा–लोणी (धामणी) रस्त्यालगतची झाडे-झुडपे अखेर हटवली; मात्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम !!

Chief Editor

Leave a Comment