
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अंतर्गत कार्यरत असलेल्या टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचा माजी विद्यार्थी तुषार गवांदे (ऑटोमोटिव्ह पेंट रिपेअर) जो शॉ टोयोटा वाघोली पुणे येथे कार्यरत आहे.याने टोयोटा स्किल कॉन्टेस्ट २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र व गोवा विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामातील गुणवत्ता यांची चाचणी घेणाऱ्या या स्पर्धेत तुषार गवांदे याने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. त्याच्या या यशामुळे समर्थ शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे. या प्रशिक्षणातून घडलेल्या विद्यार्थ्याने विभागीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या कौशल्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने संस्थेच्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाला अधोरेखित करणारे हे यश ठरले आहे.
तुषार गवांदे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर, समर्थ शेळके तसेच संपूर्ण समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


