सामाजिक

धामणीतील गाढवे मळा येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित; कमी दाबाच्या वीज समस्येतून ग्रामस्थांची सुटका

1010168545
1010168545

पंचनामा प्रतिनिधी : धामणी गावातील गाढवे मळा परिसरात अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. परिसरात १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आल्याने घरगुती वीजपुरवठा तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारे मोटारपंप सुरळीतपणे सुरू झाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला.
यापूर्वी अपुऱ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरात वारंवार कमी दाबाचा वीजपुरवठा होत होता. त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नव्हती. तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारपंपही पुरेशा क्षमतेने सुरू होत नसल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत होता. नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर ही समस्या दूर झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी धामणी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा ताई राजेंद्र जाधव पाटील, भाऊसाहेब करंडे(सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,आंबेगाव तालुका),देविदास करंजखेले( गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), सदाशिव गाढवे(वि.वि.का. सोसायटी,तज्ञ संचालक),किरण गाढवे, दिनकर गाढवे, सुनील गाढवे, लक्ष्मण गाढवे, आशिष गाढवे, हर्षद गाढवे, अनिता गाढवे, माया गाढवे,छाया गाढवे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संबंधितांचे आभार मानत, भविष्यातही गावाच्या विकासासाठी अशाच प्रकारे लोकहिताची कामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related posts

समर्थ शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

धामणी (लोणी ) येथे रंगला विठ्ठल नामाचा जयघोष !!

Chief Editor

अण्णासाहेब आवटे कॉलेजला तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा एकदा भरला वर्ग !!

Chief Editor

Leave a Comment