सामाजिक

शिंगवे (पारगाव) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद; जनआक्रोश मोर्चा

1010170053
1010170053

पंचनामा प्रतिनिधी-समीर गोरडे

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे चार वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि. १२) संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले. ग्रामस्थ तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सायंकाळी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात गावातील नागरिक, महिला, युवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोर्चानंतर आयोजित जाहीर सभेला आमदार गोपीचंद पडळकर, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या प्रकरणातील आरोपी परप्रांतीय सलून कामगार मोहम्मद फरदीन फरीद शाह (वय २०) तसेच त्याच्या सहकाऱ्यावर कठोर कारवाई करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.

1010170051

शिंगवे गावातून काढण्यात आलेल्या या मोर्चात ग्रामस्थांसह विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी नसरापूर येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देत संबंधित आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

यावेळी ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांनी पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश तुळे यांनी केले, तर रूपेश तागड यांनी सूत्रसंचालन केले.

1009850407

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

Chief Editor

पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची व्यापक मोहीम;अवघ्या दोन तासांत संपूर्ण पालखी मार्ग केला स्वच्छ !!

Chief Editor

धामणीतील गाढवे मळा येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित; कमी दाबाच्या वीज समस्येतून ग्रामस्थांची सुटका

Chief Editor

Leave a Comment