सामाजिक

राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६ मध्ये महाळुंगे पडवळ येथील कु. श्रवण विजय डोके याने संपादित केले उल्लेखनीय यश !!

img 20260820 wa0571

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६ मध्ये महाळुंगे पडवळ येथील कु. श्रवण विजय डोके याने राज्यात चतुर्थ क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
श्रवण डोके याचे मूळ गाव महाळुंगे पडवळ असून, सध्या तो आत्मा मलिक गुरुकुल, कोकमठाण येथे इयत्ता दहावीच्या सुपर फाउंडेशन विभागात शिक्षण घेत आहे.अभ्यासाबरोबरच ज्ञानवर्धक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेणाऱ्या श्रवणने आपल्या मेहनत, जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत हे उल्लेखनीय यश मिळविले आहे.श्रवणची आई श्रद्धा डोके या महाळुंगे पडवळ येथे, तर वडील विजय डोके हे थोरांदळे येथे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षक दांपत्याच्या संस्कारातून घडलेल्या श्रवणच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रवणच्या यशाबद्दल आत्मा मलिक गुरुकुल संस्थेचे प्राचार्य निरंजन डांगे, विभागप्रमुख सचिन डांगे, वर्गशिक्षक राजेंद्र जाधव तसेच मार्गदर्शक शिक्षक गणेश रासने यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे श्रवणने आपल्या गावासह आत्मा मलिक गुरुकुलच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला आहे.

1010560300
1010516783

Related posts

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे डिजिटल व्यवहारांना नवे बळ-डॉ.शीतल गिरमेसमर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे हार्डवेअर अँड नेटवर्किंग कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

मनुष्याला सर्व सोंगे आणता येतात;परंतु परमार्थ आणि पैशाचे सोंग आणता येत नाही- ह.भ.प.लक्ष्मण महाराज नागरे

Chief Editor

Leave a Comment