सामाजिक

आदर्श गाव गावडेवाडीतील जनहित पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी !!

fb img 1787625523412
fb img 1787625523412

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आदर्श ग्राम गावडेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील जनहित ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गावातील भैरवनाथ मंदिरात रविवार (ता. २७ ) रोजी सकाळी साडेआठ वाजता पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन बाळकृष्ण गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याचे माहिती संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश भोर यांनी दिली.

या सभेमध्ये मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे ,संचालक मंडळाने तयार केलेल्या मागील वर्षीच्या अखेरच्या वार्षिक अहवालाची नोंद घेणे व अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे,मागील वर्षासाठी बनवलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे,यावर्षीच्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे व त्यावर तयार केलेल्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेऊन स्वीकृत करणे, या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण करणे कामी वैज्ञानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व २०२६/ २७ करता अंतर्गत लेखा परीक्षण करण्याकरता लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्यांचे मानधन ठरविणे ,संचालक मंडळातील सदस्य व यांच्या नातेवाईक यांच्या कर्जाची म .रा .स . सं अधिनियम १९६० कलम ७५ ( २ ) १ प्रमाणे माहिती घेणे सभासदांनी तीन वर्षावरील न नेलेला लाभांस राखीव निधी खात्यात वर्ग करणे २०२६/२७ चे सभासद सेवक प्रशिक्षण कर्ज गुंतवणूक कर्ज वसुली तत्सम विषयाबाबत वार्षिक धोरणांना मान्यता देणे व अध्यक्षांच्या अनुमतीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांची चर्चा करणे आदी विषयावर चर्चा होणार आहे.

सभासदांनी बरोबर वेळेत सकाळी साडेआठ वाजता भैरवनाथ मंदिरात या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मनोज निघोट यांनी केले आहे .

1010806600

Related posts

पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा धामणी येथे क्रीडांगणाचे नूतनीकरण; ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी आदर्श उपक्रम !!

Chief Editor

वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून सहा कोटी रुपयांचा निधी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरदाळे यांना सेवा निवृत्त शिक्षक मा.मुख्याध्यापक श्री.दादाभाऊ झुंबरराव शेलार यांच्याकडून धनादेश सुपुर्द !!

Chief Editor

Leave a Comment