सामाजिक

बर्डमॅन सुमेध वाघमारे – पक्ष्यांसाठी जगणारा एक संवेदनशील माणूस !!

img 20260408 wa0212
fb img 1775616062195

शब्दांकन – रमेश खरमाळे (मा. सैनिक निसर्गमित्र)

पंचनामा विशेष – निसर्गावर प्रेम करणारे अनेकजण आपण पाहतो, पण त्या प्रेमाला कृतीची जोड देणारे काही मोजकेच असतात. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे बर्डमॅन सुमेध वाघमारे !!
पक्ष्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या जीवनासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी झटणारा हा माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाचा जिवलग मित्र!!

उन्हाळ्यात तहानलेले पक्षी असोत किंवा जखमी अवस्थेत असलेले जीव — सुमेध नेहमीच त्यांच्या मदतीला धावून जातात.
आजच्या वाढत्या प्रदूषणामुळे, झाडांच्या तोडीमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा वेळी पाणपोई उभारणे, पक्ष्यांसाठी घरटी तयार करणे आणि जनजागृती करणे या माध्यमातून ते समाजात एक सकारात्मक आणि संवेदनशील संदेश पोहोचवत आहेत.

fb img 1775616057349

त्यांचे कार्य आपल्याला शिकवते की, निसर्गाचे रक्षण ही केवळ जबाबदारी नसून ती आपली संस्कृती आहे. छोट्या-छोट्या कृतीतूनही मोठा बदल घडवता येतो, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली गेट येथे झालेली त्यांची भेट ही एक वेगळीच अनुभूती ठरली.

दोनशेहून अधिक पशुपक्ष्यांचे आवाज काढण्याची त्यांची अद्भुत कला पाहून असे वाटले की जणू आपण पक्ष्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहोत. त्यामुळेच आज ते लाखो पक्षीप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.

🙏अशा या बर्डमॅन सुमेध वाघमारे यांना मनःपूर्वक सलाम!
चला, आपणही त्यांच्या प्रेरणेने पक्ष्यांसाठी एक पाऊल पुढे टाकूया…

img 20260408 wa0202(1)
fb img 1774661444136

Related posts

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Chief Editor

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

ज्योती गोरडे यांना स्वामी विवेकानंद युवा उद्योजक पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

Leave a Comment