सामाजिक

लौकीत किल्ले निर्मिती, रांगोळी व रंगभरण स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५० स्पर्धकांचा सहभाग; ऐतिहासिक वारशासह सामाजिक प्रबोधनाचा जागर !!

1011655652
1011655668

पंचनामा प्रतिनिधी लौकी (ता. आंबेगाव) – दिवाळी म्हटली की किल्ले निर्मितीचा उत्साह आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांची आकर्षक सजावट आलीच. या पारंपरिक उत्सवाला ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक प्रबोधनाची जोड देत लौकी येथे किल्ले निर्मिती, रांगोळी रेखाटन व रंगभरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना सुमारे ५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

1011655666

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समस्त ग्रामस्थ, नवतरुण मंडळ, सावली फाउंडेशन (आंबेगाव तालुका) आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, पुणे जिल्हा समिती (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

1011655664
1011655659

स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करणाऱ्या प्रतापगड, शिवनेरी, रायगड, सिंहगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पन्हाळा, पुरंदर, मल्हारगड आणि कुलाबा आदी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. बालचिमुकल्यांनी कल्पकतेने आणि मेहनतीने उभारलेल्या किल्ल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

1011655648

महिलांच्या रांगोळी स्पर्धेतून विविध सामाजिक आणि पर्यावरणविषयक प्रश्नांवर प्रभावी भाष्य करण्यात आले. वृक्षतोड, नैसर्गिक आपत्ती, जंगल वाचवा-निसर्ग वाचवा, बालपण हरवले, एआय वरदान की शाप, शेतकरी, पाणी बचत, पर्यावरण प्रदूषण आणि मानवी आरोग्य अशा विषयांवर आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

1011655647
1011655627

या उपक्रमामुळे बालकांना ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा समजण्यास मदत झाली, तर महिलांना सामाजिक विषयांवर कलात्मक पद्धतीने आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. मनोरंजनासोबतच सहकार्य, देशभक्ती, सांस्कृतिक जतन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांच्या कलागुणांना दाद दिली.

दिवाळीच्या प्रकाशपर्वात इतिहासाचा अभिमान, कलेचा आविष्कार आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम घडविणारा लौकी येथील हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

1011605849

Related posts

निरगुडसर येथील बेटवस्ती-कारवस्ती येथे श्री मुक्तादेवी भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न !!

Chief Editor

गावडेवाडीत ‘पंढरीची वारी’ देखावा ठरतोय आबालवृद्धांचे आकर्षण

Chief Editor

जांभोरीत आदिवासी क्रांतिकारकांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी ; होनाजी भागू केंगले, स्वर्गीय शंकरराव विठू केंगले, राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांना अभिवादन; आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची मागणी !!

Chief Editor

Leave a Comment