सामाजिक

पोंदेवाडीत ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप ; जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते वितरण; अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानचा सहा वर्षांपासून सामाजिक उपक्रम !!

1011651422
1011651422

पंचनामा प्रतिनिधी पोंदेवाडी (ता. आंबेगाव) – राज्याचे मा.सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठान, पोंदेवाडी यांच्या वतीने जारकरवाडी पंचायत समिती गणातील ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते या पीठ गिरण्यांचे वितरण करण्यात आले.

सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विवेक वळसे पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थ व महिलांशी संवाद साधला.

अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये गरजू महिलांना पीठ गिरण्या, शिलाई मशीन तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम केले जात आहे. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे.

यावेळी बोलताना विवेक वळसे पाटील म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींसाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे दिला जात असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे मा. अध्यक्ष अनिल वाळुंज, पारगाव गणप्रमुख मनोज रोडे पाटील, जारकरवाडी गणप्रमुख बाळशीराम वाळुंज, प्रतिष्ठानचे पदाधिकारी व आयोजक, जारकरवाडी पंचायत समिती गणातील सरपंच, पोंदेवाडी गावचे आजी-माजी सरपंच, महिला भगिनी तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1011605849

Related posts

जलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन ; २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण जनजागृती पदयात्रा’; पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !!

Chief Editor

मानवी अस्तित्वाचा आणि निसर्गाचा मूळ गाभा शोधणारा समृध्द दस्तऐवज : निसर्ग दाता

Chief Editor

सर्वसामान्यांचा आधार म्हणजे आशाताई बुचके ; श्रद्धांजली सभेत धामणीकरांनी जागवल्या आठवणी..

Chief Editor

Leave a Comment