
पंचनामा मंचर प्रतिनिधी – आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सचिन तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये आंबेगाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सुनिल भेके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे नेतेपदी नारायण काळे, कार्याध्यक्षपदी विजय डोके, सरचिटणीसपदी विकास बाणखेले , कोषाध्यक्षपदी पांडुरंग बुट्टे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज, माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब कानडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार चासकर, तालुका संघाचे नेते श्री. विजय घिसे, पतसंस्थेचे माजी सभापती विजय वळसे, उदयकुमार लोंढे, नारायण गोरे, भास्कर चासकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी श्री. सुनिल पाटील, श्री. सुनिल बुरसे, श्री. संजीव ढोंगे , श्री. मारुती शिंगाडे, श्री. राजेंद्र चासकर, श्री. राजाराम काथेर आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे उपसभापती श्री. सोपान सैद, खजिनदार श्री. बाळासाहेब साबळे, मानद सचिव श्री. सखाराम मुंजाळ, विद्यमान संचालक श्री. संजय केंगले, श्री. संतोष लबडे, श्री. दत्तात्रय मेचकर, श्री. बाबाजी गाढवे, श्री. बाळासाहेब सैद, श्री. विकास बाणखेले, श्री.संतोष पोखरकर तसेच तालुका संघाचे व शिक्षक पतसंस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. महेश निंबराज बढे-राज्य प्रतिनिधी व श्री. सचिन रघुनाथ तोडकर यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


