सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते हनुमंत टाव्हरे यांच्या पाठपुराव्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांना प्रिंटर भेटले !!

1011206586

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार जलद आणि कमी किमतीत महसूल कागदपत्रांची सुविधा !!

पंचनामा प्रतिनिधी समीर गोरडे – आंबेगाव तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना शेतकऱ्यांना जलद आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सावळेराम टाव्हरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार तसेच शेती व जमीनविषयक इतर आवश्यक कागदपत्रे स्थानिक पातळीवरच मिळावीत आणि त्यासाठी त्यांना अनावश्यक खर्च व वेळ द्यावा लागू नये, या उद्देशाने टाव्हरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर मागणी नोंदवली होती.

या मागणीच्या अनुषंगाने त्यांना अवर सचिवांकडून लेखी पत्रही प्राप्त झाले होते. तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडेही आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, सुरुवातीला अपेक्षित कार्यवाही झाली नाही.दरम्यान, घोडेगाव तहसील कार्यालयात काही प्रिंटर आल्याची माहिती मिळाल्यानंतर टाव्हरे यांनी चौकशी केली असता ते प्रिंटर तहसील कार्यालयाच्या वापरासाठी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल करून तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी प्रिंटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

img 20261006 wa0875

या प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाव्हरे यांना वेळोवेळी कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. अखेर कार्यालय अधीक्षक, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत टाव्हरे यांना लेखी पत्र दिले. या पत्राची प्रत कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग, मंत्रालय यांनाही पाठवण्यात आली.विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी टाव्हरे यांनी यापूर्वीही २०१९-२० मध्ये तलाठी कार्यालयांसाठी लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता.

याबाबत प्रतिक्रिया देताना हनुमंत टाव्हरे म्हणाले, “आता शेतकऱ्यांना तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे शेती-जमिनीच्या संदर्भात अर्ज केल्यानंतर आवश्यक सातबारा, फेरफार व इतर कागदपत्रे तेथेच उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. ही कागदपत्रे इतर ठिकाणच्या तुलनेत कमी किमतीत, म्हणजेच जवळपास निम्म्या किमतीत मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.”
हनुमंत टाव्हरे हे नागरिकांच्या विविध समस्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देत असतात. तसेच आवश्यकतेनुसार पंतप्रधान कार्यालयाकडेही नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडेच त्यांच्या पाठपुराव्यामुळे बदलापूर येथे रेल्वेच्या चारही पटरी ओलांडण्यासाठी नागरिकांच्या सुविधेसाठी पदाचारी पूल तयार झाला आहे

1011111277

Related posts

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

लोणी (धामणी ) गावाने जपली कलगीतुऱ्याची परंपरा; नागपंचमीच्या निमित्ताने रंगणार कलगीतुऱ्याचा सामना !!

Chief Editor

पंचनामा विशेष – ३ मे आंतरराष्ट्रीय बिबट दिन !!

Chief Editor

Leave a Comment