सामाजिक

जारकरवाडीत बिबट्याची दहशत; शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ;

1011233703

जारकरवाडीत बिबट्याची दहशत; शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; जिल्हा परिषद शाळेमागील लबडे-वणवे मळ्यात बिबट मादीचा वावर; तातडीने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील लबडे-वणवे मळ्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट मादीचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बिबट मादीसोबत तिची पिल्लेही असल्याचे शेतकरी अविनाश वणवे यांनी सांगितले. दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी अचानक बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या परिसरातून लहान शालेय विद्यार्थी दररोज शाळेत ये-जा करतात. बिबट मादीसोबत पिल्ले असल्याने ती अधिक आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.

बिबट्याचा वावर वाढत असतानाही संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित ठिकाणी त्वरित पिंजरा लावावा, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न असल्याने वनविभागाने कोणत्याही अनुचित घटनेची वाट न पाहता तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

1011291592
1011291568

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील अंगणवाडीतील बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप !!

Chief Editor

समर्थ संकुलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात हुमणीचा प्रादुर्भाव!!

Chief Editor

Leave a Comment