सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांत हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न !!

img 20260402 wa0523

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील विविध गावांत हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील हनुमान मंदिरात ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड (गावडेवाडी ) यांचे हनुमान जन्माचे पहाटे कीर्तन झाले. तसेच आदर्शग्राम गावडेवाडी येथे ह.भ.प.संतोष महाराज गावडे (गावडेवाडी) यांचे कीर्तन संपन्न झाले तर अवसरी बुद्रुक येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात पार पडला.

लोणी,धामणी, खडकवाडी, वडगावपीर, पोंदेवाडी, पेठ, पारगाव, पाबळ, गावडेवाडी, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक गावांत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.थोरांदळे येथेही शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव संपन्न झाला.येथे हजारो भाविकांना पुऱ्या गुळवणी व कांद्याची चटणी महाप्रसाद म्हणून देण्यात आला.

img 20260402 wa0520

आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळीच पहाटे पाच वाजता हनुमंतरायांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भाविकांनी रांगा लावून हनुमंतांचे दर्शन घेतले. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये अतिशय उत्साहात हनुमान उत्सव पार पडला.अवसरी खुर्द येथे पहाटे पाच ते सात वाजता मधुकर महाराज गायकवाड (आदर्श गाव गावडेवाडी ) यांची हनुमान जन्माचे कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली.या कीर्तनाला अवसरी खुर्द येथील ग्रामस्थांनी भजनाची साथ दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ औषधी खुर्द व भैरवनाथ ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली होती. मधुकर महाराज गायकवाड यांचा सन्मान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश भाऊ भोर व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव भोर यांचे हस्ते संपन्न झाला.

fb img 1773887068819

पूजेचे पौरोहित्य ग्राम पुरोहित यतीनकाका कुलकर्णी तर ट्रस्टचे सदस्य दीपक टेंभेकर यांनी केले.या कीर्तनाला पंचक्रोशीतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अवसरी खुर्द आंबेगाव येथे हनुमान मंदिरात पहाटे मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी यांचे हनुमान जन्माचे किर्तन संपन्न झाले.

fb img 1773887073740

Related posts

अखेर मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला !!

Chief Editor

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट;मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश

Chief Editor

जारकरवाडी प्राथमिक शाळेचा शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात डंका !!

Chief Editor

Leave a Comment