सामाजिक

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे श्री धर्मनाथ महाराज यात्रा (बिज) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !!

img 20260117 102809

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – रानमळा (ता.आंबेगाव ) येथे श्री धर्मनाथ महाराज यात्रा ( बिज ) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार (दि.२०) रोजी सकाळी ७ ते ८ वाजता देवास हारतुरे व महापूजा, सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजता बैलगाड्यांच्या भव्य जंगी जर्यती, सायंकाळी ७ ते ९ वाजता देवास नैवद्य,दिपोत्सव व भव्य मिरवणूक व शोभेचे दारुकाम,रात्री नऊ वाजता मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे यांचा लोकनाटय तमाशाचा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजता चक्रीय भजनाचा कार्यक्रम होईल.

बैलगाड्याच्या भव्य जंगी शर्यती साठी एकूण इनाम १,७७,०११/ रुपये, दोन ईडीटिव्ही, तीन फवारणी पंप,तीन टेबल फॅन,तीन मोबाईल तसेच प्रथम क्रमांकास ५१००१/ रूपये, व्दितीय क्रमांकास ४१००१/ रूपये, तृतीय क्रमांकास ३१००१/ रूपये, चतुर्थ क्रमांकास २१००१/ रूपये.घाटाचा राजा यासाठी एकभव्य ट्रॉफी व एक खिलार बॅग तसेच फायनल साठी प्रथम क्रमांकास १५००१/ रूपये, व्दितीय क्रमांकास ११००१/ रुपये, तृत्तीय क्रमांकास ७००१/ रुपये असे बक्षिस ठेवलेले आहे.तसेच रविवार (दि.१८) रोजी सकाळी ८ ते १२ वाजता टोकन काढले जातील टोकन फी १०००/ रूपये असून ५००/ रुपये परत केले जातील व ५००/ रूपये देणगी स्वरूपात स्विकारले जातील.टोकन फि ऑनलाईन स्विकारली जाणार नाही. एका व्यक्तीस एकच टोकन मिळेल.

fb img 1768108641525

बुधवार (दि.२१) रोजी सकाळी नऊ वाजता देवास दंडवत व शेरणी कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन समस्थ ग्रामस्थ रानमळा (लोणी), मुंबई, ठाणे, पुणे येथील मंडळीनी केले आहे.अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

Related posts

अजामेळा दिंडीच्या वतीने पंढरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव !!

Chief Editor

तमाशा क्षेत्रातील तेजस्वी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व मंदाराणी खेडकर !!

Chief Editor

धामणीत चैञी पौर्णिंमेला खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी !!

Chief Editor

Leave a Comment