सामाजिक

शिंगवे (पारगाव) येथील बिबट्या अखेर जेरबंद !!

img 20260117 wa0283
img 20260117 wa0283

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

शिंगवे (पारगाव) परिसरात अनेक दिवसांपासून चकवा देणारा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असुन पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला.

शिंगवे येथील शेतकरी रमेश नामदेव वाव्हळ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.

वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल फुलमाळी, वनरक्षक पोत्रे यांनी बेस कॅम्प गावडेवाडी यांच्या साह्याने संबंधित ठीकाणी पिंजरा लावला असता पहाटे बिबट्या जेरबंद झाला.

हा बिबट्या साधारण साडेचार ते पाच वर्षाचा असून अनेक वेळा या परिसरात पशुधनांवर हल्ले करून अनेक पशु ठार केले होते.अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलेला.

यावेळी बेस कॅम्प गावडेवाडी सदस्य रेस्क्यू मेंबर नविन सोनवणे,शारदा राजगुरू,दत्ता राजगुरू यांच्या मदतीने बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी या बिबट्याला माणिकडोह येथील निवारण केंद्रात पाठविण्यात आले असल्याचे वनपाल फुलमाळी यांनी सांगितले.

fb img 1768108641525

Related posts

जारकरवाडी येथील लबडेवस्ती विद्युत डीपी जवळ रस्त्यावर पडलेत मोठे खड्डे !!

Chief Editor

हिंगेवस्ती- अवसरी बुद्रक ते पहाडदरा रस्त्याच्या घाटात धोकादायक काटेरी झाडा-झुडपांनी विळखा !!

Chief Editor

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी;अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी !!

Chief Editor

Leave a Comment