सामाजिक

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त धामणी (लोणी ) येथे विविध कार्यक्रम झाले संपन्न !!

1011035977
1011035982

पंचनामा प्रतिनिधी धामणी – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, धामणी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले.

1011035980

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘कमवा आणि शिका’ या क्रांतिकारी विचारातून हजारो विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची दिशा देत सामान्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचे कार्य त्यांनी केले.

1011035978

जयंतीनिमित्त विद्यालयात ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी धामणी गावातील पेठेतून प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीत लेझीम पथक, झांज पथक, लाठी-काठी पथक तसेच विविध महापुरुषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांमुळे प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत पोहोचविला.

1010908108
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

लोणी ते जारकरवाडी मार्गे मंचर रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर व ड्रेस वाटप !!

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यात ४३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण- जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप

Chief Editor

Leave a Comment