सामाजिक

जिद्द,कष्ट आणि यशाचा सुवर्णमहोत्सव; निरगुडसरच्या डॉ.शितल शिंदेची राज्यात दुसरी क्रमांकाची झेप !!

img 20260117 wa0427

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पं.ज.नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थींनी व शेतकरी कुटुंबातील सुकन्या डॉ.शितल रंगनाथ शिंदे हिने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून मास्टर ऑफ डॉक्टरेट ( एमडी ) पदवी मिळवली आहे.या परीक्षेत तिने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत आपल्या कर्तृत्वाची ठळक छाप उमटवली आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणाच्या प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने सर्व अडथळ्यांवर मात करत हे यश मिळवले. या यशामध्ये शिक्षक,वडील रंगनाथ शिंदे व आई मंगल शिंदे,भाऊ साक्षर शिंदे, वहिनी निशा शिंदे तसेच मामा विजय थोरात, सुरेश थोरात व सुभाष थोरात व सोपान थोरात यांचा मोलाचा वाटा असल्याचे डॉ.शितल शिंदे हिने सांगितले.

कुटुंबीयांनी दिलेले सातत्यपूर्ण पाठबळ, प्रेरणा आणि विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले, असेही तिने नमूद केले. दरम्यान, राज्याचे मा.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी डॉ. शितल शिंदे हिचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

fb img 1768108641525

तिचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. डॉ.शितल शिंदेच्या या घवघवीत यशामुळे निरगुडसर गावासह आंबेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली आहे.डॉ.शितल शिंदे हिचा विद्यालयाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, माजी प्राचार्या सुनंदा गोरे, मेंगडेवाडीचे सरंपच बाळासाहेब मेंगडे, रंगनाथ शिंदे, विठ्ठल गवारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी डॉ. शितल शिंदे हिने विद्यालय व आपल्या शिक्षकांच्या प्रति आदर भावना व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदिप वळसे पाटील यांनी डॉ.शितलचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related posts

भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर !!

Chief Editor

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू !!

Chief Editor

धामणीत खंडोबाला नागीणीच्या पानाचे लेपवन,फळ फुलांची आरास !!

Chief Editor

Leave a Comment