सामाजिक

धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या जारकरवाडीत शारदीय नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ !!

1011271024

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी महिलांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात घटाची मिरवणूक काढली. गावातील वडजादेवी व बिरोबा मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यात सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून जारकरवाडीची ओळख आहे. गावाला समृद्ध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त गावात दहा दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात विविध धार्मिक उपक्रमांद्वारे भक्तिमय वातावरण निर्माण होते. नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी महिलांची महाआरती, होमहवन आणि दुर्गापूजा हे धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.

1011270786

ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची परंपरा

जारकरवाडी गावाला प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभल्याचे सांगितले जाते. प्रभू रामचंद्र आणि सीतामाई वनवासात असताना त्यांनी काही काळ या परिसरात वास्तव्य केल्याची स्थानिक श्रद्धा आहे. गावातील पांडुरंग मंदिरात कोरीव लेणी असून, तेथे सीतामाई व प्रभू रामचंद्र यांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची धार्मिक मान्यता आहे.

पांडुरंग मंदिरासमोर मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीशी संबंधित खोदकामाचे पुरावे आढळून येत असल्याचेही सांगितले जाते. या परिसरातील ऐतिहासिक अवशेषांमुळे गावाच्या प्राचीन वारशाबाबत उत्सुकता निर्माण होते.

बिरोबा महाराजांचा उत्सव ठरतो आकर्षण

गावात बिरोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवाच्या दहाव्या दिवशी पारंपरिक बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. याच दिवशी वार्षिक भविष्यवाणी केली जाते. गावातील नागरिक मोठ्या श्रद्धेने या परंपरेत सहभागी होतात.

1011241262

शेती आणि धार्मिक परंपरेचा सुंदर संगम

सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या जारकरवाडी गावाला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे बारमाही पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरात विविध नगदी पिके घेतली जातात. शेती, धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम या गावात पाहायला मिळतो.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सण-उत्सवांमधील सामूहिक सहभाग आणि परंपरांचे जतन यांमुळे जारकरवाडी गावाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. धार्मिक आणि सामाजिक वारसा जपत गुण्यागोविंदाने नांदणारे हे गाव परिसरासाठी एक आदर्श ठरत आहे.

1011271024
1011251411

Related posts

शाहीरी भुलली अभंगाला…राजा पाटील (बापू) कवठे महांकाळकर

Chief Editor

निवेदन क्षेत्रातील कोहिनूर श्री. मयूर संभाजी सरडे

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतने राबविला आहे अनोखा उपक्रम!!

Chief Editor

Leave a Comment